27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषदहाचे नाणे देताना येतायत नाकीनऊ... वाचा!

दहाचे नाणे देताना येतायत नाकीनऊ… वाचा!

Google News Follow

Related

सध्याच्या घडीला दहा रुपयांच्या नाण्यावरून बराच वाद सुरु आहे. सामान्य जनतेमध्ये आणि दुकानदारांमध्ये त्यामुळेच वादही होऊ लागलेला आहे.

दुकानदारांपासून ते भाजी मार्केट, ऑटो, बस, पेट्रोल पंप या अशा सर्वच ठिकाणी दहाचे नाणे घेताना नाक मुरडले जात आहे. केवळ इतकेच नाही यामुळे आता दुकानदारांनी दिलेले दहाचे नाणे घेण्यास ग्राहक स्वतः नकार देत आहे. त्यामुळेच आता हे दहा रुपयांचे नाणे बनावट आहे की काय असे शंकावजा प्रश्नही उपस्थित होऊ लागलेला आहे.

मुख्य म्हणजे प्रशासनाने कोणतेही नाणे न घेतल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे, पण त्याआधी लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे. चहाची दुकाने, भाजी मार्केट, रस्त्यावरील विक्रेते, बसचालक, वाहन विक्रेते आणि छोटे दुकानदार हे आता दहाचे नाणे घेण्यास तोंडावर नकार देत आहेत. त्यामुळेच असा नकार देत असल्याने काय करावे, असा प्रश्न आता सामान्यांसमोर उभा ठाकला आहे.

रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणली. सध्याच्या घडीला आपल्याकडे १४ प्रकारची नाणी चलनात आहेत. सदर कुठल्याही नाण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. मुख्य म्हणजे याबाबत अनेकदा ‘आरबीआय’ने यापूर्वी स्पष्टीकरणही दिलेले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी गाव खेड्यात शहरांमध्ये मात्र बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

एका वर्षात मुंबईत पकडलेल्या अमलीपदार्थ विक्रेत्यांचा आकडा धक्कादायक

LIC IPO: एलआयसी आयपीओ मधून चीनी ‘कम’

पंजशीरचा ‘शेर’ ताजिकिस्तानमध्ये?

आपल्याकडे सध्याच्या घडीला बाजारामध्ये १० रुपयांची १४ प्रकारची नाणी चलनात आहेत. तसेच ही सर्व नाणी वैध असल्याचे ‘आरबीआय’ने २०१८ मध्येच जाहीर केले होते. मुख्य म्हणजे ही दहा रुपयांची नाणी बॅंका स्विकारत नसल्यामुळे दुकानदार ही नाणी घेण्यास धजावत नाहीत. अगदी साधा रिक्षावालासुद्धा आता दहाचे नाणे घेण्यास स्पष्टपणे नकार देताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा