स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

तरुणांच्या प्रतिभेला प्रेरणा देणारा दिवस

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर

‘उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत लक्ष्य गाठले जात नाही,’ स्वामी विवेकानंदांचे हे विचार नेहमीच तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव आणि राष्ट्रीय युवा दिवसाच्या रूपात साजरा केला जातो. सन १९८४मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा ‘राष्ट्रीय युवा दिवसा’ची घोषणा केली आणि त्यानंतरच्या वर्षापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी साजरा केला जातो.

युवा दिनाचे महत्त्व

स्वामी विवेकानंद हे नेहमीच तरुणांना त्यांचे जीवन चांगले करण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी प्रोत्साहित करत असत. ते सांगत असत- तरुणपिढी देशाचे भविष्य आहेत आणि तेच पुढे जाऊन देश सांभाळणार आहेत. आपले विचार आणि आदर्शांसाठी प्रसिद्ध असणारे स्वामी विवेकानंद हे धर्म, इतिहास, कला, सामाजिक विज्ञान, साहित्य या सर्वांचे विशेषज्ञ होते. युवा दिवसाचे उद्दिष्ट जीवनात येणारी आव्हाने, समस्या यांना पाहून, समजून, त्यांना दूर करण्याच्या प्रयत्नांसाठी तरुणांना प्रेरित करणेही आहे.

हे ही वाचा:

सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ऍप्पलवर मात!

जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान

२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या हाफिज भुट्टावीच्या मृत्युच्या वृत्ताला युएनचा दुजोरा

गावातून पळून गेलेले जोडपे मुलासह पुन्हा परतले, तिघांची गोळ्या घालून केली हत्या!

युवा दिन साजरा करण्याचा उद्देश

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरुणांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन देशाच्या सततच्या विकासासाठी भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी तरुणांची मदत मिळू शकते. हा दिवस म्हणजे तरुणांना त्यांच्यातील प्रतिभा आणि क्षमता वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दाखवण्याचा, कमी वयातच मोठी स्वप्ने बघण्याचा आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचाही असतो.

देशाच्या विकासासाठी युवकांचा सहभाग

युवा दिनाच्या निमित्ताने देशाच्या विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जेणेकरून तरुण वर्ग रोजगार, काम आणि व्यवसायांसारख्या आवश्यक कौशल्यासह समाज, देश आणि संपूर्ण विश्वाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. या दिनाच्या निमित्ताने तरुणांनी स्वतःचे महत्त्व ओळखावे आणि कौशल्य विकासाच्या मुद्द्यावरही चर्चा करावी. स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून देश आणि समाजाच्या विकासाला मदत केली जाऊ शकते.

Exit mobile version