‘हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी ‘जय भवानी’ शब्द का वापरावा’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

‘हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी ‘जय भवानी’ शब्द का वापरावा’

शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे यांच्यापक्षाने नुकतेच मशाल गीत प्रदर्शित केले.मात्र, ठाकरे यांच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.त्यावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मशाल गीतेतील शब्द काढणार नसल्याचे सांगितले. आणि अमित शहा यांच्या प्रचाराचा व्हिडिओ दाखवत आक्षेप घेतला.यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाण्यात जय भवानी हा शब्द तरी का आणावा.लोकसभेच्या प्रचाराकरिता उपमुख्यमंत्री फडणवीस आज हिंगोलीत असताना बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या मशाल गीतेतील शब्दांवर निवडणूक आयोगाने बोट ठेवताच.उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केला की, सत्ताधारी नेते हिंदू देव देवतांची नावे घेऊन लोकांकडून मतं मागत आहेत.आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर कारवाई करावी.

हे ही वाचा:

‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’

मुंबईतल्या भाजप कार्यालयाला आग!

‘जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते’

जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा शत्रू, ९ वर्षांनंतर छोटा राजनचे फोटो आले समोर!

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, हा प्रश्न त्यांचा आणि निवडणूक आयोगाचा आहे.आमचा यामध्ये काहीही संबंध नाही.मी एवढंच बोलू शकतो की, ‘ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाण्यात ‘जय भवानी’ हा शब्द तरी का आणावा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.ते पुढे म्हणाले की, जे काही प्रश्न असतील ते निवडणूक आयोगाला विचारावेत आमचा यामध्ये काही संबंध नाही,आम्हाला प्रश्न कशाला विचारता.

दरम्यान, आज हिंगोली सभेला संबोधित केले त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला.यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकांना विश्वास आहे की मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकार महाराष्ट्रातील अडीअडचणी सोडवेल.त्यामुळे लोकांचे आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की, हिंगोली आणि यवतमाळ-वाशीमची या दोन्ही जागा आम्हीच जिंकू.

Exit mobile version