केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधक भीती पसरवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, यासंदर्भात अनेक सदस्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत भाग घेताना गृहमंत्री शाह यांनी स्पष्ट केले की वक्फमध्ये कोणताही गैर-इस्लामी सदस्य येणार नाही.
ते म्हणाले, “माझ्या कॅबिनेट सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत, मग ते खरे असोत किंवा राजकीय. तसेच, या सभागृहाच्या माध्यमातून ते गैरसमज देशभर पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.”
हे ही वाचा :
२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!
पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना मिळणार हक्काचे घर!
म्हणून सरकार ४०० पार हवे होते…
दिग्वेश राठीने केले सेलिब्रेशन पण पंचांनी पकडला कान!
विरोधाला उत्तर देताना गृहमंत्री शाह म्हणाले, “कोणताही गैर-इस्लामी सदस्य वक्फचा भाग असणार नाही. धार्मिक संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी गैर-मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करण्याची कोणतीही तरतूद नाही आणि अशी कोणतीही तरतूद करण्याचा आमचा हेतू नाही. अशी अफवा पसरवली जात आहे की, या कायद्याचा उद्देश आपल्या मुस्लिम बांधवांच्या धार्मिक प्रथेत आणि त्यांच्या दान केलेल्या मालमत्तेत हस्तक्षेप करणे आहे. पण, अल्पसंख्याकांना घाबरवण्यासाठी हे केले जात आहे.”
ते पुढे म्हणाले, मी मुस्लिमांना सांगू इच्छितो की तुमच्या वक्फमध्ये कोणताही गैर-मुस्लिम येणार नाही. परंतु आम्ही वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिलसाठी तरतुदी आणल्या आहेत जेणेकरून वक्फच्या नावाखाली १००-१०० वर्षांसाठी कवडीमोल किमतीत मालमत्ता भाड्याने देणाऱ्यांना पकडता येईल आणि त्यांना बेदखल करता येईल. हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. वक्फचे उत्पन्न कमी होत आहे, ज्या उत्पन्नातून आपण अल्पसंख्याकांसाठी विकास करायचा आहे आणि त्यांना पुढे घेऊन जायचे आहे, तो पैसा चोरीला जात आहे. वक्फ बोर्ड आणि परिषद ते पकडेल, असे गृहमंत्री शाह म्हणाले.