23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष'एनआयए'ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

Google News Follow

Related

सुप्रसिद्ध चित्रपट शोलेमधील एक डायलॉग तुम्हाला आठवत असेल. त्यात गब्बरसिंग आपला साथीदार सांभाला विचारतो की, कितना इनाम रखे है सरकार हम पर, तेव्हा सांभा अगदी अभिमानाने म्हणतो की, पुरे ५० हजार. म्हणजे ५० हजार रकमेवरून गब्बरसिंगचा काय दबदबा आहे, हे कळते आणि त्याची ती दहशत दाखविण्याचा तो प्रयत्न होता.

मात्र जागतिक स्तरावर ज्याची आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून ओळख आहे, तसा दर्जा त्याला देण्यात आला आहे, असा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मात्र अवघे २५ लाखांचे इनाम ठेवले आहे. नुकतीच एनआयएने दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचे हे इनाम जाहीर केले. त्याशिवाय, त्याचा साथीदार छोटा शकीलसाठी २० लाख आणि दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम याच्यासाठी १५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात आले.

याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. खरे तर, दाऊद इब्राहिम हा भारतात १९९३मध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर देशाबाहेर पळाला. बाबरी मशीद पडल्यानंतर दाऊदने त्याचा बदला घेण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडविले आणि त्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले पोहोचले. या बॉम्बस्फोटासाठी त्याने मोठ्या प्रमाणावर स्फोटके देशात आणली. त्या स्फोटात अनेकांना प्राण गमवावे लागले. हे दुष्कृत्य केल्यानंतर त्याने देशाबाहेरूनच आपला अंडरवर्ल्डचा कारभार सुरू ठेवला. कालांतराने तो आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी जोडला गेला. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, अल कायदा अशा दहशतवादी संघटनांशी त्याचे सख्य असल्याचे बोलले गेले. तशी माहितीही राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून समोर येत गेली. तोच या संघटनांना आर्थिक रसद पुरवत असल्याचेही सांगितले गेले. त्याशिवाय, अनेक काळ्या धंद्यांमध्येही त्याचे हात बरबटल्याची माहिती समोर येत गेली. ड्रग्सचा पुरवठा करण्यातही दाऊदचा हातभार असल्याचे समोर येत राहिले आहे.

दाऊदने या काळ्या पैशातून प्रचंड मालमत्ता भारतात तयार केली. त्यावरही जप्ती आणली गेली आहे. अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी ज्याचा अमेरिकेने नुकताच गेम केला. अफगाणिस्तानमध्ये लपलेल्या या जवाहिरीला ड्रोनच्या सहाय्याने अमेरिकेने टिपले. त्याच्यावर तब्बल अडीच कोटी डॉलरचे इनाम लावण्यात आले होते. अशा अल कायदाला आर्थिक रसद पुरविण्याचे काम दाऊदच्या माध्यमातून होत होते. बॉलीवूडवरही दाऊदचा वरदहस्त असल्याचे सातत्याने बोलले जाते. त्याच्या आदेशानुसार अनेक गोष्टी तिथे होत असतात, त्याची दहशत या क्षेत्रातही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच असेल कदाचित दाऊदच्या कृष्णकृत्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट कधी बनले नाहीत. उलट त्याची लार्जर दॅन लाइफ अशी इमेज दाखविण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

विरारच्या तरुणाने भारताचा झेंडा अटकेपार रोवला

महिलेला मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

नव्या ‘अवतार’ची उत्सुकता

 

आज तो पाकिस्तानात लपलेला असल्याचे बोलले जाते. मागे त्याचा साथीदार छोटा शकीलचा सहकारी सलीम फ्रूट याला पकडण्यात आले होते. त्याच्याकडूनही बरीच माहिती मिळाली आहे. एवढी ख्याती दाऊदने इतक्या वर्षात मिळविली आहे. एनआयएने जेव्हा हे इनाम जाहीर केले तेव्हा छोटा शकील आणि अनिस इब्राहिम याचे आताच्या काळातील फोटोही प्रकाशित केले. पण दाऊदचा मात्र अद्याप जुनाच फोटो उपलब्ध आहे. म्हणजे इतक्या वर्षात त्याला कुणीही पाहिलेले नाही. त्याचा कोणताही फोटो उपलब्ध नाही. कधी काळी स्टेडियममध्ये बेटिंग करतानाचा त्याचा फोटो दिसतो, तर कधी पार्टीत व खुर्चीत बसलेला तेव्हाचा दाऊद अजूनही वेगवेगळ्या माध्यमातून फोटोमधून पाहायला मिळतो.

दाऊद हा इतका नामचीन असताना त्याच्यासाठी एनआयएने अवघे २५ लाख का लावावे असा सवाल कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. कदाचित, हे इनाम लावल्यामुळे दाऊदचे साथीदारही हबकले असतील. आपल्या बॉसचा दबदबा माहीत असतानाही त्याच्यावर अवघे २५ लाखांचे इनाम? पण एनआयएने त्याची अगदी लायकीच काढली आहे, असेच यावरून वाटते. तुला पकडण्यासाठी किंवा तुझा पत्ता देण्यासाठी तुझ्यावर २५ लाखांचे इनाम पुरे अशा पद्धतीने एनआयएने तो खिजगणतीतही नसल्याचे दाखवून दिले असेल. एवढेच कशाला त्याचा साथीदार छोटा शकील याच्यावर २० लाखांचे इनाम आणि त्याच्या बॉसवर पाच लाख जास्त. त्यावरूनही दाऊदची एनआयएने पार लायकी काढली आहे, असे नाही का वाटत?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा