…म्हणून एनसीईआरटीने वगळले धडे

एनसीईआरटीने एप्रिल महिन्यात नववी आणि दहावीच्या विज्ञान पुस्तकातून चार्ल्स डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

…म्हणून एनसीईआरटीने वगळले धडे

देशभरातील शालेय अभ्यासक्रमांची रचना करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (एनसीईआरटी) काही विषयांची प्रकरणे इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांमधून वगळल्यानंतर वादाचे मोहोळ उठले आहे. मात्र या कृतीचे स्पष्टीकरणच एनसीईआरटीने दिले आहे.

विषयाचा आताच्या काळाशी संदर्भ, काठिण्य पातळी आणि स्वत:हून शिकता येण्याजोगे अशा बाबींचा विचार करून ही प्रकरणे हटवण्यात आल्याचे एनसीईआरटीने म्हटले आहे. करोनाकाळात विद्यार्थ्यांना घरातून अभ्यास करावा लागला, त्यादृष्टीनेही या अभ्यासक्रमात बदल केल्याचे एनसीईआरटीने म्हटले आहे.

एनसीईआरटीने ‘लोकशाही राजकारण’ या इयत्ता दहावीच्या क्रमांक दोन पुस्तकातून ‘लोकशाही आणि विविधता’, ‘लोकशाहीसमोरील आव्हाने’ आणि ‘लोकप्रिय चळवळी आणि संघर्ष’ हे अध्याय हटविले आहेत. सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील ‘लोकशाही राजकारण’ ही प्रकरणे हटवली आहेत. काही धड्यांमधील विषय हे अन्य ठिकाणीही आल्यामुळे ते वगळण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण संस्थेने दिले आहे.

हे ही वाचा:

पाकला पराभूत करून भारताने रचला हॉकीत इतिहास

डी – मार्ट मॅनेजरने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट

मुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना

हुश्श!! पाच वर्षे झाली, आता लोअर परळ पुलाची एक मार्गिका खुली

सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेली तीन प्रकरणे समाजशास्त्र विषयातून शिकवण्यासाठी अधिक योग्य असल्याचे संस्थेने म्हटले आहे. इयत्ता दहावीच्या राजशास्त्र विषयातून लोकशाही राजकारण आणि बारावीच्या पुस्तकातून ‘भारताच्या स्वातंत्र्यानंतरची राजकीय स्थिती’ ही प्रकरणे वगळण्यात आले आहेत.

एनसीईआरटीने एप्रिल महिन्यात नववी आणि दहावीच्या विज्ञान पुस्तकातून चार्ल्स डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, इयत्ता ११ वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून महात्मा गांधींच्या हत्येचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे संदर्भ काढून टाकण्यात आले. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून विविध पातळ्यांवर मुघल इतिहासाचा संदर्भही कमी करण्यात आला आहे.

Exit mobile version