26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआमदार अतुल भातखळकरांचा घणाघात... मराठी शाळांचे वाजताहेत तीन तेरा !

आमदार अतुल भातखळकरांचा घणाघात… मराठी शाळांचे वाजताहेत तीन तेरा !

मुंबईत मराठी माध्यम शाळांना सावत्र वागणूक - आमदार अतुल भातळकर

Google News Follow

Related

मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांना सावत्र वागणूक मिळत आहे. मुंबईमधला मराठी टक्का घसरतोय, अशी जळजळीत टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केली. अतुल भातखळकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनेच्या बातमीचा दाखल देत पालिकेच्या मराठी शाळांचे तीन तेरा वाजताहेत असे गंभीर आरोप केले. भातखळकर पुढे म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या आजच्या घडीला ३,२१२ पदं मराठी शाळांकरीता मंजूर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये यातील २,०५१ शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत.

हेही वाचा :

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

अनिल जयसिंघानीसाठी राबविलेले ऑपरेशन एजे ७२ तासांनी ठरले यशस्वी!

पंजाबमध्ये योगी आदित्यनाथ असते तर गुन्हेगारी संपली असती!

ट्विटचा डाव उलटला… पीडितेच्या त्या फोटोवरून राऊतांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

मुंबईमधला मराठी टक्का घसरतोय. गेल्या पाच वर्षातल्या कालखंडात असे निर्णय घेतले की, मराठी माध्यमांच्या मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळा बंद करून पब्लिक स्कूलच्या नावाखाली इंग्रजी माध्यमांच्या शाळा या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे शासन मराठीला प्राधान्य देणारं शासन आहे. या शासनाने सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत हे अधिकृत केलं गेलं. ते म्हणायलाही सुरुवात केली. यावरही या शासनाने तोडगा काढावा, अशी विनंती यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

मुंबईतला मराठी टक्का घटवण्यामागे कोण आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात शासन काय भूमिका घेणार? या जागा भरण्याकरीता शासनानी निवेदन करावं. जिथे मराठी शाळांमध्ये शिक्षकच नसतील, तिथे दर्जेदार शिक्षण तरी कसे मिळणार? हे मुंबई महापालिकेच्या लक्षात येत नाही का? असा सवाल भातखळकरांनी विचारला.

मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळा सुरू केल्या जात आहेत. मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे? याची चौकशी करावी, तसेच मुंबईत मराठी टिकवण्यासाठी आज महापालिका प्रशासनास प्रत्येक राजकीय व्यक्तीसह मराठी मुंबईकराने जाब विचारण्याची गरज आहे, असे अतुल भातखळकर विधानसभेत म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा