केदार शिंदेंना ‘केरळ स्टोरी’ची पोटदुखी का?

आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला जाब

केदार शिंदेंना ‘केरळ स्टोरी’ची पोटदुखी का?

द केरळ स्टोरी या देशभरात चर्चेत असलेल्या चित्रपटाचे मोफत शोचे आयोजन काही नेत्यांच्या मार्फत महाराष्ट्रात केले जात आहे. मात्र त्यामुळे अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक केदार शिंदे नाराज झाले आहेत. या नेत्यांना महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट तरी माहीत आहे का, शाहीर साबळे तरी त्यांना माहीत आहेत का, असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिलला थिएटरमध्ये लागला आहे. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी ट्विट केले आहे की, दुर्दैव…महाराष्ट्रात केरला स्टोरी या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातील नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? केदार शिंदे यांनी केलेल्या या ट्विटवर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे की,  केदार शिंदे यांनी लक्षात घ्यावे की, केरळ स्टोरी चित्रपट महाराष्ट्रात नाही तर देशात सुरू आहे. आणि तो देशात चालला तर तुमच्या पोटात का दुखते आहे? हिंदूंच्या हिताच्या चार गोष्टी समोर येतायत म्हणून? कोरोनाच्या काळात तुम्हाला न्यूझीलंडला जाऊन राहावंसं वाटलं होतं ही तुमची देशभक्ती. त्यामुळे हिंदूंच्या, हिंदू समाजाच्या हिताच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका. आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या मतदारसंघात महिलांसाठी द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या खास शोचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी नेत्यांनी अशा शोंचे आयोजन केले आहे. त्यावरून केदार शिंदे यांनी सदर संताप व्यक्त केला होता.

हे ही वाचा:

गणेश नाईकांना बलात्कार प्रकरणात अडकविण्याची दिली सुपारी

पाकिस्तान तुरुंगातील १९९ भारतीय मच्छिमार सुटणार

लाईफ जॅकेट, सुरक्षा प्रमाणपत्राच्या अभावामुळे गेले २२ जीव

इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार

‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. प्रामुख्याने हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडल्यानंतर दहशतवादासाठी त्यांना वापरायचे हा गंभीर विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. त्याला काही राज्यांनी विरोध केला आहे. पण तरीही तो दरदिवशी कमाईचे विक्रम रचत आहे. केदार शिंदे यांनी केलेल्या या ट्विटवरून सोशल मीडियात त्यांच्यावर टीकाही होत आहे.

Exit mobile version