अंधेरी येथील कामगार रुग्णालय गेली चार वर्षे बंद अवस्थेत आहे. तिथे आता केंद्र सरकारच्या वतीने बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र अनेक सेवा बंद असल्याने रुग्णालय का सुरू करण्यात आले, असा प्रश्न मुंबईचे माजी उपमहापौर व काँग्रेस नेते राजेश शर्मा यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णालय सुरू केल्यानंतर कामगारांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण बऱ्याच सुपर स्पेशालिटी सेवा येथे नाहीत. सिटीस्कॅन, एमआरआय चाचण्या, रक्तपेढीसारख्या सुविधाही सुरू झालेल्या नाहीत. अग्निशमन विभागाचीही परवानगी मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांची भरतीही व्हायची आहे. असे असताना तेथील रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होत आहे, असा आरोप शर्मा यानी केला आहे. रुग्णालय सुरू करण्यात आल्याचे दाखवून कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
बस झाले! विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात आता बदल नाही
ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत निघाल्या तलवारी, सुरे, लाठ्याकाठ्या
एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस
चीनच्या मुद्द्यावर राऊतांनी मालकाची री ओढली
अंधेरी कामगार रुग्णालयाअंतर्गत असलेल्या आठ लाख कामगारांचे ३ ते साडेतीन हजार कोटी रुपये ईएसआयसीमध्ये जमा झालेले आहेत पण अद्याप त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. या रुग्णालयावर २६० कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि त्याचा २५ लाख कामगारांना लाभ होईल, असा दावा करण्यात आला होता. पण रुग्णालय सुरू करण्यात आल्याचा देखावा करण्यात आल्याचा आरोप राजेश शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून २३ ऑगस्टला त्याची सुनावणी असल्याने घाईगडबडीत रुग्णालयाचे उद्घाटन केल्याचा आरोपही त्यांनी केला.