इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?

इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?

पॅलेस्टाईन मधील कट्टरतावादी समूह हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष पेटला आहे. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आले, तर इस्रायलनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यातच आता इस्रायलकडून शनिवार, १५ मे रोजी गाझा पट्टीतील काही इमारतींवर हल्ला करण्यात आला. या इमारतींमध्ये काही आंतरराष्ट्रीय मीडियाची कार्यालये होती. या इमारतींवर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला. नागरिकांना इमारत खाली करण्यासाठी एक तासाचा कालावधी देऊन इस्रायलने हा हल्ला केला आहे.

सध्या इस्रायलकडून हमास या दहशतवादी संघटने विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. या दोन्ही बाजूंच्या संघर्षामध्ये संपूर्ण गाझापट्टी होरपळून निघत आहे. शनिवारी इस्रायलने गाझा पट्टीतील काही इमारतींना लक्ष्य केले. यावेळी इमारत खाली करण्यासाठी इस्रायलकडून नागरिकांना एक तासाचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यानंतर एक तासाने एअर स्ट्राईक करत या इमारती उध्वस्त केल्या गेल्या. यातील एका इमारतीत असोसिएटेड प्रेस, अल जझीरा आणि इतर काही माध्यमांची कार्यालये होती. या ‘अल जाला’ इमारतीच्या मालकाला यासंबंधी पूर्वसूचना देण्यात आली होती. या हल्ल्यात कोणत्याही निष्पापांचा बळी जाऊ नये यासाठी इस्रायलकडून खबरदारी घेण्यात आली.

हे ही वाचा:

नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता

नवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

इमारतीत होते दहशतवाद्यांचे अड्डे, इस्रायलचा दावा
या इमारतींमध्ये दहशतवादी लपून बसत असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांकडून मानवी ढालींचा उपयोग स्वतःचा बचाव करण्यासाठी केला जातो हे इस्रायलकडून वारंवार सांगण्यात आले आहे. याच नितीचा एक भाग म्हणून अशा नागरी इमारतींमध्ये हे दहशतवादी आसरा घेत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. या स्ट्राईकचे व्हिडीओ चित्रीकरण स्वतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केले आहे.

Exit mobile version