वायुसेनेचा विजय असो!

''नभः स्पृशं दीप्तम्'',भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य

वायुसेनेचा विजय असो!

भारतीय वायुसेनेचा ९१ वा स्थापना दिवस ८ ऑक्टोबर रविवार रोजी साजरा करण्यात येत आहे.भारतीय वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील बामरौली हवाई अड्ड्यावर आशियाचा सर्वात मोठा एअर शो आयोजित करण्यात आले आहे.

१९३२ मध्ये स्थापना
भारतीय वायुसेनेची १९३२ मध्ये स्थापना करण्यात आली होती.त्या वेळी देशावर इंग्रजांचे राज्य होते.इंग्रजांच्या शासन काळात भारतीय वायुसेनेला रॉयल इंडियन एअरफोर्स नावाने ओळखले जात होते.दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा रॉयल हा शब्द हटवण्यात आला.त्यानंतर भारतीय वायुसेना नावाने ओळखले जाऊ लागले.त्यामुळे ८ ऑक्टोबरला वायुसेना दिवस साजरा करण्यात येतो.

जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना
भारतीय वायुसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे.उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथे असलेले हिंडन हवाई दल हे आशियातील सर्वात मोठे स्थानक आहे.

हे ही वाचा:

सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला

‘इस्रो’वर दररोज होतात १०० सायबरहल्ले

दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा जुनाच!

गीता मधून घेण्यात आले आदर्श वाक्य
”नभः स्पृशं दीप्तम्”, हे भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य आहे.हे वाक्य गीता मधील ११व्या अध्यायातून घेण्यात आले आहे. महाभारतातील युद्धादरम्यान कुरुक्षेत्र मध्ये भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला देण्यात आलेल्या उपदेशाचा एक अंश आहे.

वायुसेना ध्वज
वायुसेनेचा ध्वज, वायुसेनेच्या निशाणापेक्षा वेगळा आहे, तो निळ्या रंगाचा आहे ज्याच्या पहिल्या तिमाहीत राष्ट्रध्वज बनवला आहे आणि मधल्या भागात भगवा, पांढरा आणि हिरवा या राष्ट्रध्वजाच्या तीनही रंगांनी बनवलेले वर्तुळ (गोलाकार आकार) आहे.हा ध्वज १९५१ रोजी स्वीकारण्यात आला होता.

भारताच्या ताकदीचे प्रदर्शन
भारतीय वायुसेनेच्या स्थापना दिवसानिमित्त ८ऑक्टोबर रोजी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.एक तासिय चालणाऱ्या या एअर शोमध्ये भारताच्या बहादुरीचे आणि ताकदीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.वायुसेनेतील शंभरहुन अधिक लढाऊ विमाने आकाशात आपले पराक्रम दाखवणार आहेत.
या ताफ्यात जुने विमान टायगर मॉथ, हार्बर ट्रेनर, वाहतूक जहाज सी वन थर्टी, आयएल ७८, चेतक हेलिकॉप्टर आणि रुद्र हेलिकॉप्टर यांचाही समावेश करण्यात आला आहे.एअर शोचा मुख्य उद्देश भारताच्या ताकदीचे प्रदर्शन करणे आणि त्यासोबत युवकांना वायुसेनेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

 

 

Exit mobile version