‘एनडीए’च्या बैठकीत हृदयाच्या आकाराच्या पानांनी वेधले लक्ष

‘अँथुरियम’ची पाने काय सूचित करतात?

‘एनडीए’च्या बैठकीत हृदयाच्या आकाराच्या पानांनी वेधले लक्ष

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सदस्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सेंट्रल हॉलला सुशोभित करणाऱ्या बहरलेल्या वनस्पतींनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ही झेंडूची फुले नव्हती, किंवा प्रचारफेरीमध्ये असणारी फुले नव्हती किंवा गुलाबही नव्हते. व्यासपीठाच्या मागे ‘द गेम ऑफ थ्रोन्स’मधील लोखंडी सिंहासनासारखी दिसणारी पाने असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीमागे असलेली लाल, पांढरी आणि हिरवी फुलांसारखी रोपे असोत, वेगळ्या दिसणाऱ्या या पानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

चकचकीत, हृदयाच्या आकाराची लांब पाने असलेल्या या रोपांना ‘अँथुरियम’ किंवा ‘लेसेलीफ’ असे म्हणतात.
अँथुरियम ही उष्णकटिबंधीय वनस्पती आहे, जी त्यांच्या हृदयाच्या आकाराच्या पाकळ्या आणि चमकदार पानांसाठी ओळखली जाते. या वनस्पतीचे मूळ अमेरिकेतील, विशेषत: उष्णकटिबंधीय घनदाट जंगलामध्ये आहे. या वनस्पतींना अनेकदा फुले समजले जाते. मात्र ती फुले नाहीत, परंतु कोणीही त्यांना असे म्हणू शकतो.

अँथुरियम लाल, गुलाबी, पांढऱ्या आणि हिरव्या अशा विविध रंगांमध्ये येतात. त्यामुळे सजावटीसाठी, सुशोभीकरणासाठी घरातील अन्य रोपे किंवा फुलांऐवजी या पानांना अधिक पसंती दिली जाते. ‘फर्न्स अँड पेटल्स’ या भेटवस्तू पुरवठादाराच्या ब्लॉगनुसार, अँथुरियम हे जगातील सर्वांत आकर्षक दिसणाऱ्या विदेशी फुलांपैकी एक आहे.

हे ही वाचा:

शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित

पुणे अपघातातील अपल्वायीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

‘अँथुरियम हे लग्नाच्या सजावटीमध्ये वापरले जाणारी लोकप्रिय फुले आहेत. ते लाल, पांढरे आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहेत आणि सर्वसाधारणपणे, ते आदरातिथ्य, नातेसंबंध, विपुलता आणि आनंदाचे प्रतीक आहेत,’ असे ‘एफ अँड पी’च्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

सौंदर्यात्मक विशेषणांसह अँथुरियमचे महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थ आहेत. अनेक संस्कृतींमध्ये, त्यांच्या खुल्या, हृदयासारख्या आकारामुळे या रोपांना आदरातिथ्याचे प्रतीक मानले जाते. ही फुले प्रेम, मैत्री आणि आनंदाचे प्रतिनिधित्व करतात, बहुतेकदा या भावना व्यक्त करण्यासाठी ती भेटवस्तू म्हणून देण्यास प्राधान्य दिले जाते. फेंगशुई पद्धतीमध्ये तर अँथुरियम चांगले नशीब आणतात आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात, असे मानले जाते.

Exit mobile version