भारत आणि मालदीवमधील तणाव सातत्याने वाढत आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी भारतीय लष्कराला आपला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.या गोष्टी घडून दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला असला तरी मालदीवमध्ये भारतीय लष्कर अजूनही तैनात आहे. मालदीवमधून भारतीय लष्कर कधी बाहेर जाणार? याबाबत भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमारच्या बाजूने महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी सीएनएन न्यूज-१८ शी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी सरकारने आपल्या सैनिकांना मालदीवमधून परतण्याचे आदेश दिलेले नाहीत.मालदीवमधून सैन्य माघार घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. मालदीवमधून सैनिकांनाच्या परतण्याबाबत विचारले असता कुमार म्हणाले की, “निर्णय काहीही असो, आम्ही सूचनांची वाट पाहत आहोत.”मालदीवमधून भारतीय सैन्य माघार घेण्याबाबत आतापर्यंत आम्हाला कोणताही आदेश आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मालदीवमध्ये जवळपास ८० भारतीय सैनिक आहेत. याशिवाय भारतीय लष्कराशी संबंधित १२ वैद्यकीय कर्मचारीही तेथे आहेत.
हे ही वाचा:
मनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!
जागावाटपावर एकमत झाले नाही, तर ‘इंडिया’ आघाडीचे खरे नाही
अभिनेत्री रेवती म्हणाली, ‘आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, हे पहिल्यांदाच मोठ्याने बोललो’
दरम्यान, मालदीवमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू विजयी होऊन राष्ट्राध्यक्ष बनले.राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या विजयानंतरही त्यांनी भारतविरोधी अजेंडा चालूच ठेवला आहे.यापूर्वी मुइज्जूने १५ मार्चपर्यंत भारतीय सैन्य मागे घेण्यास सांगितले होते.तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. मोहम्मद मुइज्जू यांना चीन समर्थक मानले जाते.तसेच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी चीनचा दौराही केला आहे.