काशीतील या मंदिरात प्रसाद म्हणून का देतात नाणी?

काशीतील या मंदिरात प्रसाद म्हणून का देतात नाणी?

गंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाराणसीला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे शहर भगवान शंकराचेही निवासस्थान आहे. कारण इथे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर आहे. वाराणसी संपूर्ण भारतातून भरपूर पर्यटकांना आकर्षित करते. परंतु काशी विश्वनाथ मंदिराव्यतिरिक्त, येथे एक मोठे धार्मिक मूल्य आहे.

काशी विश्वनाथ मंदिराजवळ अन्नपूर्णा देवी मंदिर आहे. धनत्रयोदशीला येथे प्रसादाच्या रूपात वाटण्यात येणारा अशिर्वाद मिळावा म्हणून भाविक मोठ्या संख्येने माँ अन्नपूर्णेची प्रार्थना करतात. अन्नपूर्णा देवी मंदिरात धनत्रयोदशीच्या दिवशी भाविकांना नाणी वाटली जातात. हे वर्षातून एकदाच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर घडते आणि म्हणूनच, भक्त देवीचा आशीर्वाद घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे मानले जाते की आई अन्नपूर्णाच्या खजिन्याचे एक नाणे घरात ठेवल्यास भक्तांना नेहमी सुख, संपत्ती आणि समृद्धी मिळते. देवीचा हा आशीर्वाद पूजेच्या खोलीत किंवा घराच्या तिजोरीत ठेवावा.

धनत्रयोदशीच्या दिवशी अन्नपूर्णा देवी मंदिरात पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या गर्भगृहात अन्नपूर्णा मातेची सोन्याची मूर्ती आहे जी धनत्रयोदशीला भाविकांसाठी उघडली जाते. धनत्रयोदशी ते दिवाळी असे चार दिवस गर्भगृह भाविकांसाठी खुले असते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अन्नकूट उत्सवानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. या मंदिरात ५०० वर्षे जुन्या सोन्याच्या मूर्ती बसवलेल्या आहेत, त्या माँ अन्नपूर्णेच्या मूर्तीसोबत या मूर्ती विराजमान आहेत. माँ अन्नपूर्णा समोर उभे असलेले भगवान शिव अन्नदानाच्या मुद्रेत आहेत. उजवीकडे लक्ष्मीची सुवर्णदेवता आणि डावीकडे भूदेवीची सुवर्णदेवता आहे.

हे ही वाचा:

ओएनजीसीचे लवकरच खासगीकरण

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल

राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी

निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?

माता अन्नपूर्णा हे पार्वतीचे रूप आहे असे म्हटले जाते. ती जगाला भरपूर अन्न देऊन आशीर्वाद देते. पूर्ण समर्पणाने पूजा केल्यास मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. अशी मंदिराशी संबंधित लोकप्रिय कथा आहे. जेव्हा भगवान शंकर काशीला आले तेव्हा त्यांनी माता अन्नपूर्णेला तिथल्या लोकांना भोजन देण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हापासून देवीची कृपा सदैव काशीवर राहते. अशी कथा आहे.

Exit mobile version