पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी (११ सप्टेंबर) देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले होते. पंतप्रधान मोदी यांचे हस्ते श्री गणेशाची आरती देखील पार पाडली. पंतप्रधान मोदींनी देखील फोटो शेअर करत या भेटीची माहिती दिली. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भेटीवर विरोधक टीका करत आहेत. विरोधकांच्या टीकेला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का?. यापूर्वीचे पंतप्रधान आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्या द्यायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे तेव्हा ही मंडळी झोपली होती का?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे ट्वीटकरत म्हणाले की, काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का??? जेव्हा जेव्हा हिंदू व हिंदूंचे सण या देशात आनंदाने व उत्साहाने साजरे होतात तेव्हाच त्यात खुसपटं काढण्याचे काम काँग्रेस व इकोसिस्टीम करत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणरायाची व महालक्ष्मीची पूजा व आरती काय केली, आख्ख्या काँग्रेस व इकोसिस्टीमच्या गोटात आगडोंब उसळला आहे.
हे ही वाचा :
पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !
मशिदीचा अनधिकृत भाग सांगा आम्हीच काढून घेतो
धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकी, मोहम्मद उमर गौतमसह १२ जणांना जन्मठेप
चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…
जेव्हा यापूर्वीचे पंतप्रधान आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्या द्यायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे तेव्हा ही मंडळी झोपली होती का? आणि यांना हिंदू आणि विशेषतः मराठी माणसांच्या सण समारंभालाच बरी जाग आली, असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले, सध्याचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे आहेत, ही सर्वच मराठी माणसांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्याकडे विराजमान असलेल्या बाप्पाच्या पूजा व आरती करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी जाणे, हा आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे. पण, महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा, हिंदूंचा आनंद काँग्रेस व इकोसिस्टीमला कसा देखवेल? या इकोसिस्टीमने काहीही निरर्थक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील व देशातील सुज्ञ जनता यांच्या नालायकपणाला बधनार नाही. गणपती ही बुध्दीची देवता आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाकडे माझे मागणे आहे की, हे गणराया या काँग्रेस व इकोसिस्टीमला सर्व सामान्यांच्या आनंदात सहभागी सुबुद्धी दे, असे बावनकुळे म्हणाले.