काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आणखी एका हिंदू सणाच्या शुभेच्या देताना भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र वगळून आपल्या नेहमीच्या शैलीत समाजमाध्यमावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधींनी हिंदू सणांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमधून जाणूनबुजून हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा वगळण्याची ही पहिलीच वेळ नाही.
गेल्या वर्षी विजयदशमी किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावर राहुल गांधींनी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेला टाळून धनुष्यबाण दाखवणारा फोटो शेअर केला होता. त्याचप्रमाणे, प्रभू राम, त्यांचे भाऊ लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या अयोध्येला परत आल्याचे चिन्ह असलेल्या दिवाळी [दीपावली] या हिंदू सणावर गांधींनी त्यांच्या आनंदी परतीच्या प्रतिमेचा समावेश न करणे पसंत केले होते.
हेही वाचा..
‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’
‘बंगालचे लोक ममतांना सत्तेतून हटवून त्यांचे गंगेत विसर्जन करतील’
भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी १५ उमेदवारांची यादी जाहीर
लडाखच्या समृद्धीसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती
हिंदू सणांना शुभेच्छा देताना हिंदू देवतांच्या प्रतिमा टाळण्याची राहुल गांधींची ‘परंपरा’ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. २०२२ मध्ये त्यांनी हिंदू देवतांच्या प्रतिमा न वापरता दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. २०२२ च्या रथयात्रा पोस्टमध्ये गांधींनी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या प्रतिमा वापरणे टाळले. २०२० मध्ये त्यांनी अशाच प्रकारे रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
२०२१ मध्ये गांधींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी पोस्टमध्ये गणरायाची प्रतिमा नव्हती. महाशिवरात्रीच्या वेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये भगवान शिवाच्या प्रतिमा किंवा त्यांची चिन्हे पोस्ट करण्याऐवजी कैलास पर्वतांची प्रतिमा टाकली होती. हिंदू सणांशी संबंधित पोस्टमध्ये हिंदू देवतांच्या प्रतिमा वगळण्यामागे राहुल गांधींचा सूक्ष्म संदेश आहे. अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचे मुस्लिम तुष्टीकरण धोरण असूनही राहुल गांधी यांनी पक्षाला आणि स्वत:ला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून सातत्याने स्थान दिले आहे. एक प्रहसनात्मक ‘सर्वसमावेशक’ अपील जपण्यासाठी हिंदू धार्मिक मूर्तिमंतता टाळली आहे.