मविआचे नेते शिवरायांच्या की, गडावर हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी !

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

मविआचे नेते शिवरायांच्या की, गडावर हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी !

छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखत आहे, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला. मविआने आता स्पष्ट केले पाहिजे की ते, छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पंढरपूरसाठी नमो एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विशाळ गडाच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विशाळ गडावरील अतिक्रमण काढले जावे अशी प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. ही सर्व कारवाई काद्यानुसार झाली पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी सरकारच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येतेय, करण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती शांततापूर्ण कशी होईल याकडे आमचे लक्ष आहे. पण, केवळ विशाळ गडावरच नाहीतर इतिहासातील सर्वच गडकिल्ल्यांवर अतिक्रमण झाले असेल तर ती काढण्याची सरकारची भावना असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा..

वरळी हिट अँड प्रकरणी मिहीर शाहला १४ दिवसीय न्यायालयीन कोठडी!

पूजा खेडकरांचे प्रशिक्षण थांबवून मसुरीला बोलावले

एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार

मौलाना रझा म्हणतात, जोडप्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करणार, कारवाईची मागणी !

मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधीपक्षांनी गैरहजेरी लावली होती. मात्र, ते आता विशाळ गडाच्या अतिक्रमणाच्या भूमिकेमध्ये मदत करण्यासाठी गडावर गेलेले आहेत, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, मला आश्चर्य वाटत, छत्रपती शिवरायांच्या गडावर काही लोकांनी केलेले अतिक्रमण जर निघत असेल तर मविआच्या पोटात का दुखत आहे. मविआच्या नेत्यांनी स्पष्ट करावे की, ते शिवरायांसोबत आहेत की हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, प्रशासनाने गडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

 

Exit mobile version