झिका का आला पुण्यात?

झिका का आला पुण्यात?

महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.  कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावातील व्यक्तिला झिका नावाच्या विषाणुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ५५ वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता.

तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिका विषाणू जीव घेणा नसला तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो.. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

लखनऊमधील मंदिरे बॉंम्बने उडवण्याची निनावी धमकी

आजपासून भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी

बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप

घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदाणीचा वापर करा.

Exit mobile version