भारतीय शेअर बाजारात सोमवारीच्या व्यवहार सत्रात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत चाललेलं ट्रेड वॉर, ज्यामुळे जागतिक आर्थिक बाजारात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. व्यवहार सत्रादरम्यान, सेन्सेक्समध्ये ३,००० अंकांहून अधिक घसरण झाली, तर निफ्टी २२,००० च्या महत्त्वाच्या स्तराखाली आला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना १५ लाख कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला.
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पेटले आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) लावले होते. त्याच्या प्रत्युत्तरात चीननेही अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लावले आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चाललेला हा संघर्ष जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम करेल अशी शक्यता आहे.
हेही वाचा..
मुंबईत सात ठिकाणी सायबर लॅब, कसे असेल कामकाज
शेअर बाजारातील गोंधळ : ट्रम्प म्हणतात आमचे धोरण योग्यच!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाबाबत व्यक्त केली चिंता
भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अॅप
अर्थतज्ज्ञ पंकज जयसवाल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, “द्वितीय महायुद्धानंतर प्रथमच संपूर्ण जग एकप्रकारे रिसेट मोडमध्ये गेले आहे, त्यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.” ट्रेड वॉरमुळे जागतिक मंदी आणि महागाईचा धोका निर्माण झाला आहे आणि याचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसेल, असं ते म्हणाले.
या आर्थिक अनिश्चिततेमुळे भारतातच नव्हे तर जागतिक बाजारांमध्येही विक्रीचा (सेलिंग) दबाव वाढला आहे. जपानचा निक्केई ७ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी ५ टक्क्यांनी, तर हॉंगकॉंगचा हँगसेंग १०.५ टक्क्यांनी कोसळला आहे. दुपारपर्यंत भारतातही नकारात्मक भावना दिसून आली. बीएसईवरील सर्व १३ सेक्टोरल इंडेक्स लाल चिन्हात व्यवहार करत होते. निफ्टी मेटल इंडेक्समध्ये ८ टक्के, तर निफ्टी आयटीमध्ये ७ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. ऑटो, रिअल्टी, तेल आणि वायू क्षेत्रातही ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे ७ टक्के आणि १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली, जे व्यापक बाजारातील दबावाचे लक्षण आहे. सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरण झालेले शेअर्स म्हणजे टाटा स्टील (सुमारे १० टक्के खाली), त्यानंतर टाटा मोटर्स, इन्फोसिस, एलअँडटी आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स अनुक्रमे ६ ते ८ टक्क्यांनी खाली आले आहेत.