वीज चोरीच्या मुद्द्यावर संभलमध्ये सपा खासदाराच्या घरी ‘स्मार्ट मीटर’

प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव आणि वीजचोरी विरोधात मोहीम सुरू 

वीज चोरीच्या मुद्द्यावर संभलमध्ये सपा खासदाराच्या घरी ‘स्मार्ट मीटर’

संभलमध्ये सपा खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्या निवासस्थानी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे. वीज विभागाने ही  कारवाई केली आहे. मंगळवारी (१७ डिसेंबर) वीज विभाग मोठ्या पोलीस फौजफाटासह त्यांच्या घरी पोहोचले आणि स्मार्ट मीटर बसवले.

जियाउर्रहमान बर्क यांच्या दिपसराय निवासस्थानातील जुने मीटर काढून नवे स्मार्ट मीटर बसवले. नवे मीटर लावण्यात आल्यानंतर जुने मीटर तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. खरे तर, या भागातून वीज चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी तपासणीसाठी वीज विभागाने मोठ्या पोलीस फौजफाटासह भागात प्रवेश करत तपासणी करण्यास सुरवात केली.

हे ही वाचा : 

दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!

रणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते!

‘योगी की कुर्बानी दे दूंगा’ अशी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तुलही सापडली!

केवळ स्मार्ट मीटर बसवण्यासाठी वीज विभागाला पोलिसांचा आधार घ्यावा लागतो हे विशेष आहे. यावरून एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिपसराय भागात एक किंवा दोन पोलीस येत नाहीत, कारण की अशा प्रकारच्या कारवाई दरम्यान अनेकदा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच संभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी झाल्याची घटना समोर आली होती. संभलमध्ये राबवण्यात आलेल्या वीज तपासणी मोहिमेत ही माहिती समोर आली होती. या मोहिमेत चार मशिदी आणि एका मदरशासह ४९ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली होती. वीजचोरीच्या ४९ घटनांमध्ये १३० किलो वॅटची वीजचोरी उघडकीस आली. या संदर्भात १.३० कोटी रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला असून दंड वसूल केला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Exit mobile version