वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?

रणदीप हुडा याने सांगितला प्रवास

वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?

अभिनेता रणदीप हुडा लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट बनवत आहे. त्याचा ट्रेलर तुकताच प्रदर्शित झाला. या निमित्ताने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने त्याची खास मुलाखत घेतली. त्यात त्यांनी हा चित्रपट साकारताना आलेला अनुभव विशद केला.

एक पक्ष सावरकर यांना वीर संबोधतो तर दुसरा पक्ष त्यांना माफीवीर म्हणतो. याबाबत तुम्हाला काय वाटते, असे त्यांना विचारले असता, ‘सावरकर हे माफीवीर नव्हते, ते हिंदुत्वाचे प्रणेते होते,’ असे रणदीप याने स्पष्ट केले. ‘सावरकर यांना वाटायचे की, मी येथेच उपासमारीने मेलो, शिक्षा मिळून मेलो, तर मी देशासाठी काहीच करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातून बाहेर पडायचे होते,’ असे रणदीप याने सांगितले. लोकसभा निवडणुकीआधी प्रदर्शित होत असल्याने तो प्रोपगंडा चित्रपट असल्याचा आरोप होईल, तुम्ही भाजपसोबत आहात, तेव्हा लोक तुम्हाला हेही म्हणतील की तुम्ही मोदींसोबत आहात, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर दिले.

‘यात मला कोणतीही शंका नाही. मोदीजी खूप चांगले काम करत आहेत आणि मी त्यांचा चाहता आहे. मात्र हा चित्रपट प्रोपगंडा नव्हे तर प्रोपगंडाविरोधी आहे,’असे रणदीपने स्पष्ट केले. तुम्ही भाजपची मदत करत आहात का, असे विचारल्यावर त्यांनी ‘मी लोकांची मदत करत आहे. मी देशातील सर्वांत मोठ्या क्रांतिकारकांपैकी एक असणाऱ्या क्रांतिकारकाची गोष्ट घेऊन आलो आहे,’ असे रणदीप म्हणाला.

हे ही वाचा :

स्पॅनिश महिलेला मारहाण करून बलात्कार!

‘त्या मालिकेने दिली आयुष्याला कलाटणी’

शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार

ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?

सरकारकडून पैसे मिळाले?
गेल्या काही महिन्यांत काश्मीर फाइल्स, द केरला डायरी, आर्टिकल ३७०, वॅक्सिन वॉर असे चित्रपट आले. त्यावर हे प्रोपगंडा चित्रपट असल्याचा आरोप झाला. अशा चित्रपटांना पैसे सरकारकडून मिळतात का, असे विचारल्यावर त्याने स्पष्टपणे ‘नाही’ असे उत्तर दिले. ‘मी दोन वर्षांपासून या चित्रपटावर काम करतोय. मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मला असे वाटले की, दोन वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा मलाच झाली आहे. अनेक अडचणींतून मार्ग काढून हा चित्रपट मी बनवला आहे. आणि जर तुम्ही याला प्रोपगंडा चित्रपट म्हणत असाल तर खुशाल म्हणा. मला काहीच अडचण नाही,’ असे रणदीपने स्पष्ट केले.

या चित्रपटात पैसे का टाकले, असे विचारले असता, ‘ याच्याशी मी आधीपासूनच जोडला गेलो असल्याने मी या चित्रपटात पैसे टाकले. तसेच, मी स्वतःला, स्वतःच्या कलेला, जे मला सांगायचे आहे, त्याला स्वतःच समर्थन करू शकलो नाही तर मी दुसऱ्याच्या पाठिंब्याची अपेक्षा कशी करू शकतो? त्यामुळे मी जे बोलतो, त्यावरच पैसे लावतो,’ असे उत्तर रणदीपने दिले.

Exit mobile version