नितीन गडकरींनी का घेतली अमिताभ बच्चन यांची भेट?

नितीन गडकरींनी का घेतली अमिताभ बच्चन यांची भेट?

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी भेट घेतली. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या पाठींब्याची मागणी नितीन गडकरी यांनी केल्याचं नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

भारतातील ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना’साठी अमिताभ बच्चन यांचा पाठिंबा मागितल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. जनजागृतीच्या या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन यांनी पाठींबा द्यावा अशी नितीन गडकरी यांची अपेक्षा होती आणि त्यासाठीच नितीन गडकरी स्वतः बच्चन यांच्या घरी पोहचले होते.

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून ‘रस्ता सुरक्षा अभियान’ सुरू असून या अंतर्गत नागरिकांनी सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात येते. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी या मोहिमेला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाठिंबा द्यावा अशी नितीन गडकरी यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी बच्चन यांच्या घरी जाऊन त्यांनी पाठींबा द्यावा अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

‘रस्ता सुरक्षा अभियाना’तून रस्त्यावर वाहन चालवताना तसेच पायी चालताना सुरक्षा कशी राखायची याबाबत जनजागृती करण्यात येते. भारतात रस्ते अपघातांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे ८० हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो आणि ही संख्या संपूर्ण जगाच्या तुलनेत १३ टक्के आहे.

Exit mobile version