भाजप महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी १००० रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले असल्याचे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विधानभवनात चालू अधिवेशनादरम्यान मेघना बोर्डीकर या एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओचा दुसरा अर्थ काढण्यापूर्वी मेघना बोर्डीकर यांनी यासंदर्भात ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. बोर्डीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी १००० रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते.
हे ही वाचा:
आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’
नवाब मलिकांच्या जामीनात दोन आठवड्यांची मुदतवाढ
मानवी कश्यप बनली पहिली ट्रान्सजेंडर महिला पोलीस निरीक्षक !
मुंबई गुटखामुक्त करा, काँग्रेस नेते राजेश शर्मांची मागणी !
ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पीएकडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे.
सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले.
मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज…— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) July 12, 2024