अमिताभ बच्चन यांनी पान मसाल्याची जाहिरात का नाकारली?

अमिताभ बच्चन यांनी पान मसाल्याची जाहिरात का नाकारली?

अलीकडच्या ब्लॉग पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी उघड केले की पान मसाला ब्रँडचा अम्बॅसेडर म्हणून त्यांनी पद सोडले आहे. कारण त्यांना या जाहिरातीबद्दलचा काही तपशील माहिती नव्हता. पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यावर पान मसाला ब्रँडला प्रोत्साहन दिल्याबद्दल टीका करण्यात आली होती.

अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉग पोस्टवर एक निवेदन शेअर केले आहे, ज्यात अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयातून असे लिहिले आहे, “कमला पसंद, जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी, अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात ते या करारातून बाहेर पडले.” निवेदनात जोडले आहे की, ७९ वर्षीय स्टारने ब्रँडशी केलेला करार “सरोगेट जाहिरात” म्हणून वर्गीकृत करतो. हे अचानक का झालं असं तपासल्यावर हे कळलं की जेव्हा अमिताभ बच्चन ब्रँडशी करारबद्ध झाले, तेव्हा त्यांना माहिती नव्हती की हे सरोगेट जाहिरातीच्या प्रवर्गात येते.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा करार संपवून जाहिरात करूंन मिळालेले पैसे परत केल्याचेही निवेदनातून स्पष्ट झाले आहे. “अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी करार संपुष्टात आणला आहे. तिन्ही प्रमोशनसाठी मिळालेले पैसे परत केले आहेत.”

हे ही वाचा:

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

…म्हणून भारत-चीन चर्चेची १३वी फेरी ठरली अपयशी!

‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’

‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंतराळ क्षेत्रात खासगी गुंतवणूक हवी’

सध्या अमिताभ बच्चन यांच्याकडे ब्रह्मास्त्र, झुंड, मे डे आणि गुडबाय असे चित्रपट आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या हंगामाचे सूत्र संचालन करतात.

Exit mobile version