चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

तेलंगणातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांना पत्र लिहून कोविड-१९ नंतर तिच्या गावाकडे येणारी, बंद पडलेली बस सेवा पूर्ववत करण्यासाठी मदत मागितली आहे.

या प्रकरणावर सरन्यायाधीशांद्वारे माहिती दिल्यानंतर, तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (TSRTC) रंगा रेड्डी जिल्ह्यातील गावात बस सेवा पुन्हा सुरु केली, असे TSRTC च्या प्रसिद्धीपत्रकात बुधवारी म्हटले आहे.

जिल्ह्यातील चिदेडू गावातील रहिवासी असलेल्या पी वैष्णवीने तिच्या गावात बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सीजेआयला पत्र लिहिले होते. त्यात असे म्हटले होते की, बस सुविधेअभावी तिला आणि तिचा भाऊ आणि बहिणीला शाळा-कॉलेजला जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. तिने सांगितले की बस सेवा नसल्यामुळे तिच्या मित्रांना आणि इतर गावकऱ्यांनाही त्रास होत आहे.

ती प्रवासासाठी ऑटोरिक्षाचे शुल्क भरू शकत नाही. कोविड-१९ च्या पहिल्या लाटेत हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या वडिलांचे निधन झाले, तिची आई नोकरी करते त्यामुळे तिला आणि तिच्या भावाला शाळेत सोडायला येऊ शकत नाही. असे तिने पात्रात सांगितले.

तिच्या पत्राला उत्तर देताना, सरन्यायाधीशांनी TSRTC चे MD व्हीसी सज्जनार यांना मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी बस सेवा पुन्हा सुरु करायला सांगितले. असे त्यात म्हटले आहे.

TSRTC व्यवस्थापनाच्या वतीने, MD व्हीसी सज्जनार यांनी सरन्यायाधीशांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली की त्यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला जाग आणली. त्याचबरीबर  सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल वैष्णवीचे कौतुक केले.

हे ही वाचा:

चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?

पंतप्रधान मोदी आज देवभूमीत

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

MD व्हीसी सज्जनार यांनी मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी कॉर्पोरेशनच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, असे प्रकाशनात म्हटले आहे. TSRTC आश्वासन देते की ते संपूर्ण तेलंगणा राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. असेही ते म्हणाले.

Exit mobile version