म्हणून रखडली आहेत मुंबई, ठाण्यातील बांधकामे

म्हणून रखडली आहेत मुंबई, ठाण्यातील बांधकामे

एनसीसी नावाच्या बांधकाम कंपनीला सरकारकडून १५ नवीन ऑर्डर्स ८९८० कोटींच्या एकूण ऑर्डर्स.

कोणत्याही शहरात बांधकाम करताना पर्यावरण नियमांच्या काही गोष्टींना हात लागू नये याकरता काळजी घेतली जाते. म्हणूनच या अनुषंगाने सध्या मुंबई ठाण्यातील काही बांधकामे याच मुद्द्यांच्या आधारे रखडलेली आहेत. मुंबई, ठाणे एमआयडीसी, नवी मुंबई आणि रायगड भागात सध्या बांधकामे बंद आहेत. ही बांधकामे सुरळीतपणे सुरू राहावीत याकरता महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज (एमसीएचआय) आणि कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडिया पुढे सरसावले आहे.

ठाण्यालगतची खाडी फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील अभयारण्याभोवती असलेल्या पर्यावरण संवेदनशील पट्टय़ासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अंतिम अधिसूचनेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करून परिणामकारक व वेगाने पावले उचलावी आता संघटनांनकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिसूचनेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्यास, पाच लाख कोटींपेक्षा जास्त गृहप्रकल्पांवर थेट परीणाम होणार आहे. तसेच या परिणामांमुळे बांधकाम क्षेत्रात काम करणारे हजारो बांधकाम मजूर बेरोजगार होतील.

हे ही वाचा:
चक्क वकिलालाच पोलिस ठाण्यात ठेवले डांबून

शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र

…जशी याच्या बापाची जहागिर होती

राहुल गांधीं विरोधातल्या याचिकेचे महाराष्ट्र कनेक्शन

मुंबईतील दहा किलोमीटरच्या परिघात १५ प्रभाग येतात. मुलुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व, परळ, माटुंगा इत्यादी महत्त्वाच्या परिसरांमधील विकासकांना बांधकाम करण्यात आता अडथळे येणार आहेत. तसेच याचा परिणाम म्हणून खरेदी करणारे सुद्धा घराचा ताबा घेऊ शकणार नाहीत. मुद्रांक शुल्क सवलत लागू न केल्यामुळे मंदावलेल्या घरविक्रीला चालना देण्यासाठी या प्रकरणी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version