संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वद्य षष्ठीचा हा ‘नाथषष्ठीचा दिवस’ म्हणून ओळखला जातो. पैठण या नाथांच्या गावी आज समाधी उत्सव असतो. हा दिवस ‘जलसमाधी दिन’ म्हणून सुद्धा साजरा करतात. फाल्गुन षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्या होत्या. म्हणूनच याला ‘पंचपर्वश्रेणी’ असेही म्हणतात. नाथ स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. नंतर नाथानी सुद्धा याच दिवशी जलसमाधी घेतल्यामुळे ‘श्री एकनाथ षष्ठी’ हा दिवस साजरा करण्यात येतो.
बघूया पंचपर्व कसे ?
नाथांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांचा जन्म, स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन आणि अनुग्रह, नाथांना स्वामींचे दर्शन आणि अनुग्रह , श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी आणि श्री एकनाथमहाराज जलसमाधी म्हणूनच फाल्गुन शंखाला वेगळेच महत्व आहे. भाविक याच आनंद घेतात.
श्रीमद भागवत स्कंधची मराठी टीका, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर अशा प्रमुख ग्रंथाचे रचनाकार म्हणजे संत एकनाथ महाराज. गरुकृपेंने त्यांना भगवान दत्तात्रयांचे दर्शन झाले. संत एकनाथ यांचा जन्म पैठण इथे विक्रम सवंत १५९० च्या सुमारास झाला. संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या वडिलांचा आणि नंतर आईचा मृत्यू झाला. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबानी चक्रपाणी यांनी केला. लहानपानापासून संत एकनाथ खूपच हुशार होते. त्यांच्या गुरुचे नाव श्री जनार्दन स्वामी होते.
हे ही वाचा:
अमेरिकेत ‘भारतीयांना’ आता सहज ‘व्हिसा’ मिळणार
१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….
धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…
‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू
गुरूंच्या कृपेने त्यांना ध्यानांत श्री गुरु दत्तात्रयांनी दर्शन दिले. तेव्हा त्यांना कळले कि श्रीगुरु दत्तात्रय आहेत आणि दत्तात्रयच श्री गुरु आहेत. श्री जनार्दन स्वामी यांनी त्यांना श्रीकृष्णच्या उपासनेची दीक्षा दिली. आणि शूलभंजन पर्वतावर राहून तपश्चर्या करण्याचा आदेश दिला. कठोर तपश्चर्या करून ते गुरुआश्रमात परतले. त्यानंतर तीर्थयात्रा करून ते पैठणला परतले. आजी,आजोबा आणि गुरूंच्या आज्ञेने विधिवत गृहस्थाश्रमात प्रवेश केला.
पैठण येथे नाथषष्ठीची वारी खूप मोठ्या प्रमाणांत साजरी करून वारकरी समाज एकत्र होतो. ४७५ दिंड्या अनेक गावांमधून भानुदास एकनाथचा गजराने दुमदुमून जातो. पैठणला हा उत्सव अष्टमी पर्यंत साजरा करतात. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण होते आणि षष्ठीला पहाटे दोन वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यांत येतो. समाधी मंदिरात शेकडो भाविक टाळमृदंगाच्या गजरात पावल्या खेळण्यात लीन होऊन जातात. मंदिराची सजावट म्हणजे येथे उंच ठिकाणी गुळ लाह्यांचे मोठे लाडू बांधण्यात येतात.