32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेष...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

Google News Follow

Related

डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची १३२ वी जयंती भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ते  भारत सरकाराच्या सामाजिक न्याय मंत्रालयापासून ते जागतिक दर्जाचे वकील, थोर समाजसुधारक आणि विद्वान होते. देशाचे संविधान निर्माते तसेच दलित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. बाबासाहेबांनी आपल्या विचारातून एक संपूर्ण आदर्श समाज बांधणीचे काम केले होते. त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांच्या त्याकाळातील विविध नेत्यांशी असलेल्या वैचारिक मतभेदांचीही तेवढीच चर्चा होते.

महात्मा गांधींशी त्यांचे कसे संबंध होते याची चर्चा होत असते मात्र त्याचवेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर हिंदुत्ववादी नेत्याशी त्यांचे संबंध कसे असतील याबद्दलही कुतुहल असते. हिंदुत्ववादी विचारसरणीचे असले तरी वीर सावरकरांबद्दल बाबासाहेबांना आदर होता. जातीच्या आधारावर भेदभाव करणे बंद झाले पाहिजे हे वीर सावरकरांचेही विचार होते. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सावरकरांनी पतीत पावन मंदिर उभारले तेव्हा सर्व जातीधर्मातील लोकांना आमंत्रित केले होते. सावरकरांच्या या भूमिकेबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांची स्तुती केली.

हे ही वाचा:

गौतम नवलाखांच्या आयएसआयशी संबंधांच्या शक्यतेवरून एनआयएने जामीन नाकारला  

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे!

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

‘सावरकर:इकोज ऑफ फॉरगॉटन पास्ट’ पुस्तकाचे लेखक विक्रम संपत म्हणतात, सावरकरांनी १९३१ मध्ये रत्नागिरी येथे ”पतितपावन” मंदिर बांधले.या मंदिरात सर्व जाती धर्मातील लोकांना येण्याची परवानगी होती. तेव्हा आंबेडकरांनी सावरकरांची स्तुती करत म्हणाले सावरकर अशी एक व्यक्ती आहे ज्यांना दलित समाजाला मिळालेल्या अभिशापाबद्दल जाणीव आहे.

बाबासाहेबांनी भारत विभाजन अनुसरून एका पुस्तकात लिहिले होते, सावरकर हे भारत विभाजनशी सहमत नव्हते. हिंदूमहासभा आणि सावरकर विभाजनाच्या विरोधात होते असेही म्हणाले. पाकिस्तान आणि भारत विभाजन पुस्तकात आंबेडकर म्हणतात, मुस्लिमांनी केलेल्या मागणीबद्दल सकारात्मकता दर्शविली होती.सावरकरांना समजण्यासाठी त्यांच्या मूलभूत सिद्धांताना समजणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा