भाजप नेते सीटी रवी यांनी काँग्रेस राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.चार राज्यांचे लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजप आघाडीवर आहे.निवडणुकीदरम्यान भाजप नेते सीटी रवी यांनी काँग्रेस राहुल गांधी यांच्यावर टीका करत ट्विट करत म्हणाले की, सर्वात मोठी पनौती कोण?’, असा सवाल राहुल गांधी याना सीटी रवी यांनी विचारला आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यात भाजप पक्ष आघाडीवर आहे.तेलंगणामध्ये थोडं चित्र वेगळं आहे.तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएस पक्षात लढत आहे.आलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाला ६५, बीआरएसला ४० आणि भाजपला ९ जागेवर विजय मिळाला आहे.
हे ही वाचा:
गिरगावमधील चारमजली इमारतीला आग; दोन ठार!
मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान गुन्हेगाराची नाकाबंदी!
मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!
मुंबई वाहतूक विभागाकडून २५० कोटी रुपये दंडाची वसुली!
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांना पनवती असे म्हटले होते.मात्र, मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगढ राज्याचे निवडणुकीचे निकाल पाहता सर्वात मोठा पनवती कोण असा प्रश्न भाजप नेते सीटी रवी यांनी राहुल गांधींना विचारला आहे.
सीटी रवी यांनी ट्विट केले की, ‘सर्वात मोठी पनौती कोण आहे?’, सीटी रवी यांनी ट्विटर वर लिहिले आणि त्यांच्या पोस्टमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला टॅग केले.दरम्यान, निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यात मुसंडी मारली आहे.