व्यापाऱ्यांकडून मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत
सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने आज किरकोळ आणि घाऊक व्यापार यांना एम. एस. एम. ई. मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स
भारतीय सैन्याला मिळाली नवी ब्रिजिंग सिस्टिम
आमीर खान- किरण राव यांचा १५ वर्षांनी घटस्फोट
रावत यांचा राजीनामा राज्यपालांकडे सादर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात सांगितले की, या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे २.५ कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. गडकरी म्हणाले की, या नव्या सुधारणांमुळे या क्षेत्रालाही प्राधान्यक्रम असलेल्या क्षेत्रांचे लाभ मिळू शकतील.
किरकोळ आणि घाऊक विक्री यापूर्वीही सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगात समाविष्ट होते, पण त्यांना सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रातून वगळण्यात आले. ते उत्पादन विभाग नाहीत किंवा सेवा क्षेत्रातही येत नाहीत त्यामुळे त्यांना उद्योग आधार मिळणे शक्य नाही. अर्थात एमएसएमईमध्ये नोंदणी करणे शक्य नव्हते. पण आता सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता किरकोळ आणि घाऊक व्यापारी उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी करू शकतात. या निर्णयाचे किरकोळ आणि घाऊक व्यापारी संघटनांनी स्वागत केले असून रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना मिळत असलेल्या बॅंकांच्या सवलती या सुद्धा उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने आजपर्यंत बँका रिझर्व्ह बँकेच्या प्रियाॅरिटी लेंडिंग मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे फक्त उद्योगांना प्राधान्यक्रम असलेल्या क्षेत्रासाठी कर्ज दिले जात होते. आता ते किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना सुद्धा उपलब्ध होईल. भारतात जवळजवळ अडीच कोटीच्या वर व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना संरक्षण – पेशकार
यासंदर्भात भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी म्हटले आहे की, भाजप उद्योग आघाडीची जबाबदारी सुद्धा या दृष्टीने आता वाढली आहे. अनेक सवलती व अनेक योजना कालांतराने या क्षेत्रासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. एका अर्थाने कोरोना काळात अडचणीत आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी संरक्षित केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व व्यापारी बंधूंचे तसेच केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार.