दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू   

दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू   

दिवाळीच्या निमित्ताने घराला रोषणाई करत असताना साताऱ्यातील एका कुटुंबाला विजेचा धक्का लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. कुटुंब प्रमुख सुनील पवार यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यातील मोरे कॉलनीत दिवाळी तोंडावर असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. मोरे कॉलनीत राहणारे सुनील पवार हे आपल्या घराला विद्युत रोषणाई करत होते. घरातील इतर सदस्यही त्यांना मदत करत होते. घराच्या दुसऱ्या मजल्याववर रोषणाई करत असताना सुनील मोरे यांचा हात चुकून वीज वितरणच्या मुख्य लाईनला लागला. यामुळे सुनील पवार यांना विजेचा धक्का लागला आणि ते विजेच्या तारेला चिकटले.

हे ही वाचा:

गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार

गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून पत्नीने त्यांच्या बचावासाठी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला असता पत्नीलाही विजेचा धक्का बसला आणि त्याही चिकटल्या. त्यानंतर या दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी आपल्या आई- वडिलांना वाचवण्यासाठी हात लावला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला.

संबंधित घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. वीज पुरवठा बंद करुन संपूर्ण कुटुंबाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने सुनील पवार यांचा उपचार करण्यापूर्वीच मत्यू झाला होता. तर पवार यांच्या पत्नी आणि दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version