बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली आहे. सोशल मिडीयावर पोस्टकरत हत्येची जबाबदारी घेतली आहे.
शुभ्भू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. दाउदच्या टोळीशी जवळीक असल्यामुळे बाबा सिद्दीकींना या घटनेला सामोरे जावे लागले असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसच अभिनेता सलमान खानचा उल्लेख देखील या पोस्टमध्ये केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सध्या सुरु आहे. याच दरम्यान, बिश्नोई टोळीने हत्येची जबादारी घेतली आहे. ही पोस्ट अधिकृत आहे का? याचा शोध आता सायबर पोलीस घेणार आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करणार आहेत.
हे ही वाचा :
बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!
रेल्वे रुळावर सापडला ‘एलपीजी सिलिंडर’
बाबा सिद्दीकी हत्या, हल्लेखोरांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार, हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई!
शुभ्भू लोणकर महाराष्ट्र फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ओम जय श्री राम जय भारत. मला जीवनाचा अर्थ माहिती आहे. मी शरीर आणि पैसा ही धूळ असल्याचे समजतो. मी जे केले ते चांगले काम होते. मी जे काही केले ते मैत्रीच्या धर्माचे पालन होते. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती, पण तू आमच्या भाईचे नुकसान केले आहे. आज बाबा सिद्दीकी किती चांगले होते, हे सांगितले जात आहे. तो एकेकाळी दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होता. यांच्या मरणाचे कारण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील असलेले संबंध. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु.
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, आमच्यातील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्की प्रतिक्रिया देवू. सुरवातीला आम्ही कधीच वार केलेला नाही. जय श्री राम जय भारत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पोलीस याचा तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, पोस्ट उल्लेख केलेला अनुज थापन हा सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला आरोपी होता. पोलीस कोठडीत असताना अनुज थापनचा मृत्यू झाला होता.