टी-२० वर्ल्डकपसाठी शार्दुलला संधी मिळेल?

टी-२० वर्ल्डकपसाठी शार्दुलला संधी मिळेल?

संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या संघात स्थान मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे. विशेषतः पाच जागांसाठी तीव्र स्पर्धा असेल. मुंबईकर शार्दुलला यात संधी मिळेल का, याची सध्या चर्चा सुरू आहे.

कोरोनाच्या काळात राखीव खेळाडूंची फळी ठेवणे आवश्यक असल्याने त्यासाठी खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळेल. विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, यजुर्वेंद्र चहल हे खेळाडू तर या संघासाठी निश्चित मानले जात आहेत. पण कोरोनाचे संकट लक्षात घेता १५ खेळाडूंचा संघ आणि राखीव खेळाडूही निवडले जातील त्यामुळे त्या जागांसाठी रस्सीखेच होणार आहे.

हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजा हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत शिवाय, सात पूर्ण फलंदाजही आहेत. पण या फलंदाजांपैकी एखाद्या दुखापत झाली किंवा कोरोनाचा फटका बसला तर त्याजागी त्या दर्जाचा उत्तम फलंदाज आवश्यक असेल. वरच्या किंवा मधल्या फळीसाठी निवड समिती तसा फलंदाज निवडेल. त्यात मग शिखर धवन, श्रेयस अय्यर, इशान किशन, पृथ्वी साव, संजू सॅमसन यांची नावे विचाराधीन आहेत.

हे ही वाचा:

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार

चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

गोलंदाजांच्या बाबतीत पाहायचे झाले तर हार्दिक हा बुमराह आणि भुवनेश्वर यांच्यानंतर तिसरा मध्यमगती गोलंदाज म्हणून उपयुक्त ठरेल पण त्याव्यतिरिक्त आणखी दोन वेगवान गोलंदाज हवे आहेत. हा वर्ल्डकप यूएईमध्ये खेळला जाणार असल्यामुळे आयपीएलमधील कामगिरी पाहता दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्या नावांचा विचार होऊ शकेल. शार्दुलने आताच इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड ठरू शकते. तर चहर स्विंगच्या सहाय्याने पॉवर प्लेमध्ये दमदार कामगिरी करू शकतो. टी. नटराजनच्या नावालाही पसंती मिळू शकते.

फिरकी गोलंदाजांचाही अतिरिक्त ताफा तयार ठेवावा लागेल. त्यात राहुल चहरला संधी मिळू शकेल का, याचे उत्तर निवड समिती देईल. कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावांचाही विचार होऊ शकेल. कुतुहल जागृत करणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याच्यावर निवड समिती विश्वास दाखविते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Exit mobile version