‘हे’ असणार नवे हवाई दल प्रमुख?

‘हे’ असणार नवे हवाई दल प्रमुख?

एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या निवृत्तीनंतर मिग-२९ के फायटर पायलट एअर मार्शल वी आर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख होणार आहे. सरकारने मार्शल वी आर चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून मार्शल वी आर चौधरी प्रमुख पदाची सूत्रे स्विकारणार आहे. मार्शल वी आर चौधरी हे २७ वे प्रमुख आहेत.

हवाई दलाचे उपप्रमुख बनण्यापूर्वी एअर मार्शल चौधरी यांनी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे कमांडर-इन-चीफ म्हणून काम केले आहे. या कमांडवर संवेदनशील लडाख प्रदेश तसेच उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. एअर मार्शल चौधरी यांचा २९ डिसेंबर १९८२ रोजी हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला. ३ वर्षांच्या विशिष्ट कारकीर्दीत या अधिकाऱ्याने भारतीय हवाई दलाची विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमाने उडवली आहेत. त्यांच्याकडे मिग – २१, मिग – २३ एमएफ, मिग – २९ आणि सुखोई – ३० एमकेआय लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल फ्लाइंगसह ३,८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

हे ही वाचा:

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा

एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी २०१९ साली हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्विकारली होती. भदौरिया जून १९८० मध्ये  भारतीय हवाई दलात आले. राष्ट्रीय रक्षा अकादमीचे माजी विद्यार्थी भदौरिया यांना सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तब्बल चार दशके त्यांनी देशाची सेवा केली आहे. या दरम्यान भदौरिया यांनी जगुआर स्क्वाड्रन आणि एका प्रमुख हवाई दलाच्या स्टेशनचे देखील नेतृत्त्व केले आहे. १९९९ साली ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

Exit mobile version