‘अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार’

अनुंकपा तत्त्वावर मिळालेली नोकरी गमावणाऱ्या व्यक्तीला दिलासा देण्यास सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा नकार

‘अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार’

अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र अर्हता पूर्ण करण्यास पात्र न ठरल्यास त्यांना कनिष्ठ श्रेणीतील पद द्यावे, असा याचा अर्थ नाही. अनुकंपा तत्त्वावर मिळालेली नोकरी हा अधिकार नाही. त्यासाठी अर्हता पूर्ण करावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

अनुंकपा तत्त्वावर मिळालेली नोकरी गमावणाऱ्या व्यक्तीला दिलासा देण्यास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नकार दिला. सांख्यिकी विभागात चालक म्हणून काम करणाऱ्या पित्याच्या मृत्यूनंतर रेहन यांना कनिष्ठ साहाय्यकाची नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्यांना बेसिक कम्प्युटर आणि टायपिंगची परीक्षा देऊन त्यात किमान गुण मिळवण्यास सांगण्यात आले होते. मात्र कम्प्युटर आणि टायपिंगच्या परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांना आणखी एक संधी दिली गेली.

हे ही वाचा:

सकाळी ९ चा भोंगा बंद करा अन्यथा… संजय राऊतांना धमकी   

ड्रेसकोड पाळणार नाही, ‘अबाया’ घालू द्या… काश्मीरमध्ये विद्यार्थिनींचे शाळेविरोधात आंदोलन

तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

त्या रेल्वे पोलिसांनी चार महिन्यांत ५३ जणांचे जीव वाचवले!

मात्र पुन्हा ते टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे सांख्यिकी अधिकाऱ्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ केले. या आदेशाला त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी जर ते कनिष्ठ साहाय्यक पदासाठी पात्र नसतील तर त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये नोकरी द्यावी, अशी याचिका केली होती. मात्र उत्तर प्रदेश सरकारने या याचिकेला आव्हान दिले. मात्र उत्तर प्रदेश सरकारची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Exit mobile version