कोवॅक्सिनला २४ तासात मिळणार डब्ल्यूएचओची मान्यता

कोवॅक्सिनला २४ तासात मिळणार डब्ल्यूएचओची मान्यता

जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) तांत्रिक समिती आज मंजुरीसाठी भारतनिर्मित कोवॅक्सिन लसीचे पुनरावलोकन करेल. रॉयटर्सने जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रवक्त्याचा हवाला देत हे वृत्त दिले आहे.

प्रवक्त्याने पुढे जोडले की त्यांना पुढील २४ तासांच्या आत कोवॅक्सिनच्या वापराबाबत WHO ची शिफारस अपेक्षित आहे. मार्गारेट हॅरिस यांनी यूएन प्रेस ब्रीफिंगमध्ये पत्रकारांना सांगितले की, “जर सर्व काही योग्य असेल आणि सर्व काही पद्धतशीर दाखल केले असेल आणि समितीचे समाधान झाले तर आम्ही पुढील २४ तासांच्या आत शिफारसीची अपेक्षा करू.”

डब्ल्यूएचओने सांगितले होते की ती “सुरक्षित आणि प्रभावी” असल्याची खात्री करण्यासाठी लसीचे संपूर्ण मूल्यांकन केले पाहिजे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक, ज्याने कोवॅक्सिन विकसित केले आहे, त्यांनी लसीच्या आपत्कालीन वापर सूचीसाठी (EUL) १९ एप्रिल रोजी WHO कडे एक्सप्रेशन ऑफ इंट्रेस्ट (EOI) सादर केली होती.

हे ही वाचा:

भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

मंजुरीच्या विलंबावर, WHO ने म्हटले आहे की “ते कोणतीही सूट देऊ शकत नाहीत. आणीबाणीच्या वापरासाठी उत्पादनाची शिफारस करण्यापूर्वी ते सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही त्याचे पूर्णपणे मूल्यांकन केले आहे.”

WHO ची EUL प्रक्रिया ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणीमुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी या उत्पादनांची उपलब्धता जलद करण्याच्या अंतिम उद्देशाने विनापरवाना नसलेल्या लसींचे मूल्यांकन आणि सूचीबद्ध करण्याची जोखीम-आधारित प्रक्रिया आहे.

Exit mobile version