ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर ब्रिटनचा कारभार राजा चार्ल्स तृतीय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, लवकरच राजा चार्ल्स हे आपला मुकुट सोडतील आणि त्यांना नवी जबाबदारी मिळेल, असं भाकीत करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिष नॉस्ट्राडेमस यांनी राजा चार्ल्स यांच्याबद्दल हे भाकीत केले आहे. नॉस्ट्राडेमस यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे चार्ल्स यांच्याबाबत केलेल्या भाकिताकडे लक्ष असणार आहे. फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिष नॉस्ट्राडेमस हे त्यांच्या भविष्यातील घटनांच्या भाकितामुळे प्रसिद्ध आहेत. नॉस्ट्राडेमस यांनी ६ हजार ३३८ भाकितं केली आहेत आणि त्यातील ७० टक्के भाकितं खरी ठरल्याची माहिती आहे.
२००५ मध्ये नॉस्ट्राडेमसबद्दल माहिती असलेल्या मारियो रीडिंगच्या पुस्तकात अनेक प्रकारच्या दाव्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार किंग चार्ल्स यांना वयाच्या ७४ व्या वर्षी ब्रिटनची राजेशाही मिळणार आहे. तसेच सिंहासन पदी येताच लवकरच या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ब्रिटनचे लोक राजा चार्ल्स यांच्याबद्दल निराश असतील, असंही भाकितात पुढे म्हटले आहे. प्रिन्सेस डायनापासून घटस्फोट, तिचे वय आणि अशा इतर काही मुद्द्यांमुळे जनक्षोभ असेल आणि या निषेधामुळे राजा चार्ल्सला सत्ता सोडण्यास भाग पाडले जाईल. चार्ल्सनंतर प्रिन्स विल्यम नव्हे तर त्यांचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी ब्रिटनच्या सिंहासनावर बसणार असल्याचे देखील म्हटले आहे.
हे ही वाचा:
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स
२४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम खिताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा
जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला
‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’
हिटलरचं राज्य, दुसरं महायुद्ध, ९/११ चा दहशतवादी हल्ला, फ्रान्स क्रांती यासारख्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला होता आणि या खऱ्या ठरल्या होत्या. काही शतकांपूर्व त्यांनी वर्तवलेली भाकितं काही प्रमाणात खरी ठरत असल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसायला लागला आहे.