31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषबूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले 'हे' महत्वाचे वक्तव्य

बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य

Google News Follow

Related

जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही. डब्ल्यूएचओनं बुधवारी म्हटलं की, सर्वात आधी सर्वात सर्वात आधी आपल्याला जगातील गरीब देशांना पूर्णपणे लसवंत करण्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे.

डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं की, “कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की, सध्या बूस्टर डोसची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.” दरम्यान, अमेरिकेनं २० सप्टेंबरपासून देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकारनं डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं हा निर्णय घेतला आहे.

डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी श्रीमंत देशांमध्ये कोरोना लसीच्या बूस्टर डोस देण्याबाबत म्हटलं की, “जगभरात सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. चिंतेचं कारण म्हणजे, लस योग्य संख्येत, योग्य ठिकाणी पोहोचत नाही.”

त्यासोबतच त्यांनी म्हटलं आहे की, “गरीब देशांमधील सर्वांचं जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. दरम्यान, गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करुन देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर आहोत.”

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया

उद्धवचा काळ संपला, लवकरच भाजपाची सत्ता येणार

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

तालिबानला पोसणाऱ्या देशांनाच तालिबानचा धोका?

डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीनुसार, जगातील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, मे महिन्यात प्रत्येक १०० लोकांसाठी सरासरी ५० डोस उपलब्ध होते आणि त्यानंतर आतापर्यंत ही संख्या दुप्पट झाली आहे. तेच जर कमी उत्पन्न असलेल्या देशांबाबत बोलायचं झालं तर, इथे पुरवठ्याच्या कमतरतेमुळे प्रत्येक १०० लोकांपाठी लसीची मात्रा सरासरी १.५ डोस इतकी आहे. दरम्यान, डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस घेतल्यानं कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होईल, असंही अद्याप सिद्ध झालेलं नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा