सीईटी नसेल तर बघावी लागणार वाट

सीईटी नसेल तर बघावी लागणार वाट

अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलांना सीईटी देणे ऐच्छिक आहे, पण प्रवेश घेताना प्राधान्य कुणाला मिळणार याविषयी संभ्रम असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वाट बघावी लागणार आहे. संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेन्ट) आणि अल्पसंख्यांक (मायनॉरिटी) या राखीव जागांवरील प्रवेश गुणवत्तेनुसार करणे आवश्यक असल्याने राखीव जागांसाठीही सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे.

सीईटी ऐच्छिक असली तरीही अकरावी प्रवेश प्रक्रियेत सीईटी महत्वाची आहे आणि ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळणार असल्याचे शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशासाठी ऑफलाईन पद्धतीने सीईटी घेतली जाणार आहे. पण जे विद्यार्थी सीईटी देतील त्यांचाच प्राधान्याने विचार केला जाणार आहे, त्यामुळे जे सीईटी देणार नाहीत, त्यांना वाट पाहावी लागणार आहे.

केंद्रीय संस्थांतर्गत १० टक्के जागा, ५ टक्के जागा व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये अल्पसंख्याक राखीव जागा या ५० टक्के असतात. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात राखीव जागांचा तपशील दिला असला तरी सीईटीच्या बाबतीतले धोरण स्पष्ट न केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

हे ही वाचा:

शास्त्रज्ञांनी प्रथमच टिपल्या ताऱ्याच्या मरणकळा!

जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?

नीरज चोप्राचे पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून कौतूक

नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!

अकरावी प्रवेश प्रक्रियेत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे स्पष्टता दिली आहे. राखीव जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देणे आवश्यक आहे म्हणूनच सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित एकत्रित प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य मंडळाला दिली होती. परंतु राज्यातील एकाही केंद्रीय आणि खाजगी शिक्षण मंडळाने प्रश्नसंच राज्य मंडळाकडे दिला नसल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version