आयपीएलमधील सर्वात कंजूस गोलंदाज कोण?

सर्वाधिक मेडन ओव्हर टाकल्या

आयपीएलमधील सर्वात कंजूस गोलंदाज कोण?

टी-२० फॉरमॅटमध्ये फलंदाज वेगवान गोलंदाजावर तुटून पडून धावांचा वर्षाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गोलंदाजांच्या गळ्यावर नेहमीच टांगती तलवार असते. आयपीएलच्या इतिहासात असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी एका षटकात ३६ पेक्षा जास्त धावा दिलेल्या आहेत. परंतु काही नावे अशी आहेत ज्यांनी भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये धावा वाचवणं एखाद्या गोलंदाजासाठी खूप अवघड असतं, पण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजाबद्दल जाणून घेऊया.

आयपीएलच्या जवळपास १६ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या ११९ सामन्यांत १४ मेडन ओव्हर टाकल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तो पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स संघाकडून खेळला. प्रवीण कुमारने २००८ ते २०१७ या कालावधीत आयपीएलमध्ये ११९ सामन्यांत ९० विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा :

‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र

मविआने पडणाऱ्या जागा दिल्या; वंचितची तक्रार

कॅनडात भारतीय वंशाचे जोडपे, अल्पवयीन मुलीचा घरातील आगीत संशयास्पद मृत्यू

गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश

सामन्यांनुसार त्याच्या विकेट्सची संख्या कमी असली तरी इकॉनॉमी रेटमुळे तो संघासाठी उपयुक्त गोलंदाज ठरला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत ७.७३ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. जी टी-२० फॉरमॅटमध्ये खूप चांगली असल्याचे म्हटले जाते. प्रवीणचा स्विंग बॉल फलंदाजांना चकवा देण्यास सक्षम होता. सर्वाधिक मेडन ओव्हर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे. आतापर्यंत १२ मेडन ओव्हर त्याने टाकल्या आहेत. त्याच्यामागोमाग ११ मेडन ओव्हर टाकणारा ट्रेंट बोल्टचा नंबर लागतो. प्रवीण कुमारने २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१७ मध्ये तो शेवटचा आयपीएल खेळताना दिसला होता.

Exit mobile version