वावा सुरेश हे एक प्रसिद्ध साप पकडणारे आणि केरळमधील वन्यजीव संरक्षक आहे. त्यांना नुकतेच कोट्टायम जिल्ह्यातील एका घरातून कोब्रा वाचवत असताना त्या कोब्राने त्याचा चावा घेतला. मात्र सुरेश यांनी प्रथम कोब्राला वाचवले आणि नंतर ते रुग्णालयात दाखल झाले.
वावा सुरेश हे गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक सेवक म्हणून साप पकडत आहे आणि केरळ वन विभागाला मदत करतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘स्टीव्ह इर्विन’ आणि ‘स्नेक मास्टर’ असे संबोधले जाते. वावा सुरेश यांनी आतापर्यंत तीस हजारहून अधिक सापांना पकडले आहे. त्यातील तीन हजारांहून अधिक सापांनी त्यांचा चावा घेतला असून त्यापैकी ३९६ हे विषारी साप होते.
कोण आहेत हे वावा सुरेश?
वावा सुरेश यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला आहे. ते तिरुवनंतपुरमच्या श्रीकार्यम शहरात एका छोट्या घरात राहत होते. सुरेशला सापांचे आकर्षण लहानपणापासूनच होते. जेव्हा तो बारा वर्षांचा होता तेव्हा तो शाळेत जात असताना त्याची पहिली गाठ सापाशी पडली. त्याने त्या सापाला पकडून घरी आणले. त्या सापाला एका बाटलीत त्याने १५ दिवस ठेवले होते. तेव्हापासून त्याची प्राणघातक सरपटणाऱ्या प्राण्यांशी दीर्घ मैत्री सुरू झाली.
वावा सुरेश सरपटणारे प्राणी पकडण्यासाठी हुक किंवा इतर तीक्ष्ण हत्यारे वापरत नाहीत म्हणून त्यांना स्टीव्ह इर्विन म्हणून ओळखले जाते. त्यांचा मल्याळम चॅनेलवर ‘स्नेक मास्टर’ नावाचा स्वतःचा टीव्ही शो आहे.
हे ही वाचा:
लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले
स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’
‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी
सुरेशच्या म्हणण्यानुसार, साप- मानवांच्या चकमकीमुळे सापांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सुरेशने घरी वीस हजाराहून अधिक सापांची अंडी उबवली आणि नंतर त्यांना जंगलात सोडले. त्याचे घर म्हणजे मिनी ‘स्नेक पार्क’ म्हणून ओळखले जाते.