विद्यापीठाला नाव देण्यात आलेले राजा महेंद्र प्रताप सिंह कोण आहेत? वाचा सविस्तर

विद्यापीठाला नाव देण्यात आलेले राजा महेंद्र प्रताप सिंह कोण आहेत? वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने २०१९ मध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलीगढमध्ये राज्यस्तरीय विद्यापीठ उघडण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेश सरकारच्या घोषणेनंतर मंगळवारी (१४ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी केली आहे.

अलीगढमध्ये उभारण्यात येणाऱ्या विद्यापीठाला राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे नाव देण्यात आले आहे. जाट समाजातील या राजाविषयी फारच कमी लोकांना माहित आहे. राजा महेंद्र प्रताप सिंह यांचा जन्म १८८६ मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झाला होता. महेंद्र प्रताप सिंह यांना शिक्षणाची आवड होती. राजा महेंद्र प्रताप सिंह त्याकाळातील उच्चशिक्षित व्यक्ती होते.

हे ही वाचा:

गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेले पाच बुडाले! दोघांना वाचविले

बाप्पाला निरोप देण्यासाठी बर्लिनमध्येही वाजले ढोल ताशे

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करताना लेखक आणि पत्रकार म्हणूनही उत्तम काम केले. पुढील काळात ते हाथरसच्या मुरसान संस्थानचे राजे झाले. महेंद्र प्रताप सिंह यांनी १ डिसेंबर १९१५ रोजी अफगाणिस्तानात निर्वासित पहिल्या सरकारची घोषणा केली होती. राजा महेंद्र प्रताप सिंह सुमारे ३२ वर्षे भारताबाहेर राहिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्तरावर बरेच प्रयत्न केले होते.

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी महेंद्र प्रताप सिंह १९४६ मध्ये भारतात परतले होते. भारतात परतल्यानंतर त्यांची वर्धा येथे महात्मा गांधींशी भेट झाली होती. पण त्यावेळी त्यांच्याकडे काँग्रेस पक्षात विशेष लक्ष दिले गेले नाही. देशाला स्वतंत्र्य मिळाल्यानंतरही ते राजकारणात सक्रीय होते. १९७९ मध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे निधन झाले. बीबीसीच्या अहवालानुसार कामाच्या संदर्भात त्यांच्या आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कामात बरीच साम्य दिसून येतात.

Exit mobile version