कोण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह?

कोण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबोले यांचे निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. होसबोले यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ते संघात सह सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते.

बेंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक सुरू आहे. दार तीन वर्षांनी प्रतिनिधींच्या बैठकीत सरकार्यवाहांची निवड होते. ही बैठक एक वर्ष उत्तर भारतात, एक वर्ष दक्षिण भारतात आणि एक वर्ष संघमुख्यालय असलेल्या नागपुरात होते. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या जागी आता दत्तात्रय होसबोले यांची निवड करण्यात आली आहे.

दत्तात्रय होसबोले यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही (एबीव्हीपी) काम केलं. ते एबीव्हीपीचे दोन दशकं संघटन महामंत्री होते. आता ते संघात सह सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते.

हे ही वाचा:

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह

अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात

प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स

चीनच्या रणगाड्यांचा सामना करायला भारताकडे नवी क्षेपणास्त्रे

संघात दर तीन वर्षांनी सरकार्यवाहची निवड होते. संघटनेतील हे कार्यकारी पद आहे. तर सरसंघचालक हे मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. संघाच्या नियमित कार्यांच्या संचालनाची जबाबदारी सरकार्यवाहांवर असते. याशिवाय प्रतिनिधी सभेत इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाते. सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. प्रत्येक तीन वर्षानंतर जिल्हा स्तरावरून संघाची निवड प्रक्रिया सुरू होते. सरकार्यवाह आधी जिल्हा आणि महानगर संघचालकाची निवड करतात. त्यानंतर विभाग संचालक आणि प्रांत संघचालकांची निवड केली जाते. निवडणुकीनंतर सर्व अधिकारी आपल्या नव्या टीमची घोषणा करतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय स्तरावर प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरकार्यवाहची निवड होते. त्याच बैठकीत क्षेत्र संघचालकाचीही निवड केली जाते.

Exit mobile version