विधान परिषदेच्या ११ जागांसाठी काल निवडणूक पार पडली. ११ जागेंसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात शेकापच्या जयंत पाटलांचा शिवसेना उबाठाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी पराभव केला. दरम्यान, जयंत पाटलांचा पराभव हा ठरवून केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय… ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासह छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात आणि हे सर्व महाराष्ट्र पाहत असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे ट्विटकरत अभिनंदन केले आणि शिवसेना उबाठावर आरोप केले. आशिष शेलार यांनी म्हटले की, विधान परिषद निवडणूकीत विजयी झालेल्या भाजपच्या पाचही उमेवाडारणाचे उमेदवारांचे अभिनंदन.
हे ही वाचा:
भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक
स्पष्टच झालं…मविआमध्ये सगळं आलबेल नाही!
पिस्तुल दाखवून दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल
संभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले
शिवसेना उबाठावर टीका करत आशिष शेलार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. ( गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती)
तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय… ? महाराष्ट्र पाहतोय. छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !
सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!महाराष्ट्र पाहतोय…
◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.
◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील… pic.twitter.com/4ax2PdKyMl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 13, 2024