बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस (CDS) अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे मुख्य काम आहे ते म्हणजे लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत.
बिपीन रावत यांचा जन्म आणि शिक्षण
बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील हे सुद्धा लष्करात सेवेत होते. बिपीन रावत यांचे बालपण सैनिकांमध्ये गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि ते डेहराडूनला गेले. त्यांचे यश पाहून त्यांना ‘SWORD OF HONOUR’ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली आणि हायकमांडचा कोर्सही केला.
बिपीन रावत यांची लष्करातील कारकीर्द
अमेरिकेतून परत आल्यावर बिपीन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लष्करी सेवेत जाण्याच्या प्रयत्नांना १६ डिसेंबर १९७८ रोजी यश मिळाले. रावत यांना गोरखा ११ रायफल्सच्या ५व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आले. त्यांनी लष्कराची धोरणे समजून घेतली आणि धोरणे तयार करण्याचे कामही केले. त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर सेवा बजावली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार
इम्रान खानच्या ‘नया पाकिस्तान’ची ही दशा
जागतिक सरासरीपेक्षा भारतात १०% जास्त महिला वैमानिक
सीडीएस हेलिकॉप्टर अपघात: राजनाथ सिंग संसदेत माहिती पुरवणार
सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.