बेशिस्त वर्तन आणि सातत्याने पक्षविरोधी वर्तन केल्याने काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णन यांची हकालपट्टी केली आहे. आचार्य प्रमोद कृष्णन यांनी नुकतेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते आणि या सोहळ्यात गैरहजर राहिल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली होती. या पक्षविरोधी कारवायांमुळे मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.
कोण आहेत आचार्य प्रमोद कृष्णन?
कृष्णन यांनी सन २०१९ची लोकसभा निवडणूक लखनऊतून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी तेव्हा एक लाख ८० हजार मते मिळवली होती.सन २०१४मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील संभल येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हाही ते पराभूत झाले होते.प्रियंका गांधी वड्रा यांची काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना साह्य करण्यासाठी स्थापन केलेल्या उत्तर प्रदेश सल्लागार समितीचे ते सदस्य होते.
हे ही वाचा..
शेतकऱ्यांचे दिल्लीला प्रयाण; हरियाणातून पंजाबला जाणारे रस्ते बंद!
हल्द्वानी हिंसाचाराला पोलिस-प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत!
पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू
पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म!
आचार्य प्रमोद यांच्या निलंबनाची कारणे काय?
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, समाजवादी पक्ष संभल आणि लखनऊ या दोन्ही जागांवर दावा करू शकते. या दोन्ही जागांवर आचार्य प्रमोद यांची नजर असल्याने त्यांची काँग्रेसने हकालपट्टी केल्याचे मानले जाते.
१९ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील कल्किधाम येथे आयोजित पायाभरणी सोहळ्याला आचार्य प्रमोद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण दिले होते. तसेच, या पायाभरणी सोहळा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेटही घेतली होती.