२०२१ चा मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा दीक्षांत सभागृहात पार पडला. हा कार्यक्रम वेबकास्टही करण्यात आला होता. रत्नागिरीच्या विद्यार्थ्याला भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल २०२१ सालचे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नेहमीच ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाचे प्रशंसक आणि प्रेरणादायी होते. विज्ञानावर आधारित धर्म त्यांनी नेहमीच मान्य केला होता. त्यांच्या मताचा आदर करून मुंबई विद्यापीठात दरवर्षी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक प्रदान केले जाते. यावर्षी, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राची विद्यार्थिनी प्रियंका पेंढारी हिला विज्ञान शाखेत उत्कृष्ट गुण मिळाल्याबद्दल पारितोषिक देण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित प्रियंका पेंढारी म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वभावात जी जिद्द होती, तो स्वभाव त्यांनी अंगीकारला आणि त्याचा परिणाम समोर आहे.
हे ही वाचा:
चीनविरुद्ध भारताने आकारले ‘अँटी डंपिंग’ शुल्क
केयर्नने भारत सरकारविरुद्धच्या केसेस मागे घेतल्या
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी
१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी
या कार्यक्रमाला राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलगुरू भगतसिंग कोश्यारी, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, कुलगुरू सुहास पेडणेकर आणि विद्यापीठांचे अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते. दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांना वारंवार प्रोत्साहन देताना दिसले.