ईडीने शेख शाहजहांचा काळा पैसा पांढरा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन महिलांसह चौघांचा शोध सुरू केला आहे. ही माहिती सूत्रांनी दिली. या व्यक्तींची नावे जया शॉ, राबेया बीबी मोल्ला, प्रताप बिस्वास आणि जॉर्ज कुट्टी अशी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत. ईडी त्यांचा शोध घेत आहे. शाहजहां आणि त्यांच्या नातेवाइकांनी या चौघांशी अनेक व्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीचे अधिकारी त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अन्य केंद्रीय तपास संस्थांची मदत घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शाहजहांच्या छोट्या भावाला पकडण्याचा प्रयत्न
सध्या फरार असलेला शाहजहांचा छोटा भाऊ शेख सिराजुद्दीन यालाही पकडण्याचा प्रयत्न ईडीचे अधिकारी करत आहेत. सिराजुद्दीन त्याच्या मोठ्या भावाचा मच्छीचा व्यवसाय सांभाळत होता. या माध्यमातून अवैध स्रोतांमधून मिळालेला पैसा वळवला जात होता. कोट्यवधी रुपयांच्या रेशन वितरण प्रकरणातील संपत्तीचा एक भाग शाहजहां कसा मत्स्यपालन आणि मत्स्यनिर्यात व्यवसायात गुंतवणुकीच्या माध्यमात कसा वळवत होता, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न ईडीचे अधिकारी करत आहेत.
हे ही वाचा..
मतदानानंतरच्या हिंसाचारामुळे न्यायालयाने ममता सरकारला फटकारले!
जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग!
मंदिरे पाडून अयोध्येत विकासकामे होणार नाहीत; अंडरपास बांधणार!
जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार
शाहजहांसह ५० व्यक्तींच्या खात्यांचा तपास
शाहजहांसह ५० व्यक्तींच्या बँकखात्यांचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत. या व्यक्तींनी रेशनपुरवठा प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा पुरावा मिळाला आहे. यापैकी काही जणांना चौकशीसाठी समन्स पाठवण्याची तयारी ईडीकडून सुरू आहे.
अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताला समन
ईडीने रेशनपुरवठा प्रकरणात चौकशीसाठी लोकप्रिय बंगाली चित्रपट अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता हिला याआधीच दोन समन्स पाठवले आहेत. मात्र ती अद्यापही ईडीसमोर हजर झालेली नाही. तर, शेख शहाजहांला फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तिथपासून तो तुरुंगातच आहे. त्याला अटक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्याला निलंबित केले होते.