ही दोन औषधे कोरोनावर प्रभावी

ही दोन औषधे कोरोनावर प्रभावी

कोरोना आणि ओमायक्रोनने जगभरात धुमाकूळ घातला असताना आता एक दिलासादायक बातमी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन नवीन औषधांना मान्यता देण्यात आली आहे. ही औषधे कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड- १९ महामारीपासून रुग्णांचे संरक्षण करण्यासाठी दोन औषधांच्या वापरास मान्यता दिली आहे. कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास ही दोन्ही औषधे दिली जाऊ शकतात. या औषधांमुळे रुग्णाला तात्काळ आराम मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही खाली येईल असे मानले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले की, कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि बॅरिसिटिनिब ही औषधे गंभीर किंवा गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या औषधांमुळे रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढली असून बाधितांसाठी व्हेंटिलेटरची गरज कमी झाली आहे.

हे ही वाचा:

जवानांनी अशी साजरी केली लोहरी

मंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार

…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

संधिवाताचे औषध बॅरिसिटिनिब, कॉर्टिकोस्टिरॉईड्स या दोन्ही औषधांचा वापर गंभीर कोरोना रूग्णांवर उपचारासाठी करण्यात आला, त्यामुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढले असून व्हेंटिलेटरची आवश्यकताही कमी झाली. ज्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त आहे. त्यांच्यासाठी हे प्रभावी आहे. यामध्ये वृद्ध, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे किंवा मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश आहे.

Exit mobile version