देशभरात शोककळा अन राहुल गांधींचा नववर्ष साजरा करण्यासाठी परदेश दौरा!

भाजपा प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांची टीका

देशभरात शोककळा अन राहुल गांधींचा नववर्ष साजरा करण्यासाठी परदेश दौरा!

भारतीय जनता पक्षाने सोमवारी (३० डिसेंबर) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते नववर्ष साजरे करण्यासाठी परदेशात गेले असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश शोक करत असताना राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी परदेशात जात आहेत. देशात सात दिवस शोक आहे. काँग्रेसला डॉ. मनमोहन सिंग यांची पर्वा नाही. त्यांनी आयुष्यभर त्यांचा अपमान केला आणि आताही तेच करत आहे. काल त्यांची अस्थिकलश घेण्यासाठी कोणीही गेले नाही. काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्यासही नकार दिला होता. हा त्यांचा खरा चेहरा आहे, असे पूनावाला यांनी म्हटले.

राहुल गांधींसाठी ‘पर्यटन’ ही नवीन गोष्ट नाही. माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद बदलून ‘पर्यटन नेता’ आणि ‘पक्ष नेता’ केले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली असतानाच राहुल गांधी पर्यटन आणि पक्षाच्या कामासाठी परदेशात गेले आहेत, असे मीडियाच्या वृत्तात म्हटले आहे. राहुल गांधी यांचे हे पर्यटन काही नवीन नाही. जेव्हा २६/११ चा मुंबई हल्ला झाला तेव्हा ते रात्रभर पार्टी करत होते. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाचे त्यांना काही दु:ख नाही, असे पूनावाला यांनी म्हटले.

हे ही वाचा : 
तालिबानी फतवा; महिला दिसू नयेत म्हणून खिडक्याच नकोत!
केजरीवालांकडून आता पुजाऱ्यांना साद; दरमहा मिळणार १८,००० रुपये
केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान!
Exit mobile version